दीपिकाला मिळाला आलियाचा पाठिंबा; 'फेक बेबीबंप' म्हणणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 01:29 PM2024-05-23T13:29:19+5:302024-05-23T13:32:58+5:30

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे.

Alia Bhatt shows support for Deepika Padukone amid trolling around her baby bump | दीपिकाला मिळाला आलियाचा पाठिंबा; 'फेक बेबीबंप' म्हणणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

दीपिकाला मिळाला आलियाचा पाठिंबा; 'फेक बेबीबंप' म्हणणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. अलिकडेच लोकसभा निवडणुकीत रणवीर व दीपिका पांढरे शर्ट व डेनिम पँट अशा लूकमध्ये मतदानासाठी आले होते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो व व्हिडीओंमध्ये दीपिका पदुकोणचा बेबी बंप पाहायला मिळला. अनेक पापाराझी अकाउंटवरून दीपिका व रणबीरचे हे व्हिडीओ शेअर करण्यात आले. पण, यानंतर अनेकांनी दीपिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यावर आता 'फेक बेबीबंप' म्हणत दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना आलियानं सडेतोड उत्तर दिलं. 

दिपिकाला 'फेक बेबी बंप' म्हणत ट्रोल करण्यास सुरुवात केली. या ट्रोलिंगवर ज्येष्ठ पत्रकार फाये डिसूझा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं. ही पोस्ट आलियानं लाईक केली आहे.  ज्येष्ठ पत्रकार फाये डिसूझा पोस्टमध्ये लिहलं, 'प्रिय सोशल मीडिया, दीपिका पादुकोण तिचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडली. तिने तिच्या शरीरावर किंवा प्रेग्नंसीवर तुमचा फीडबॅक मागितला नव्हता. तुम्हाला तिच्या आयुष्यातील कोणत्याच पैलूवर टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. हे थांबवा आणि सुधारा'. आलियासह तिची बहीण पूजा भट्ट, शाहीन भट्ट आणि आई सोनी राजदान यांनी सुद्धा या पोस्टला लाइक केलं आहे.

\

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी 29 फेब्रुवारी 2024 रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये स्टार कपलने खुलासा केला आहे की,"सप्टेंबर 2024 मध्ये त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे". दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच तिचा 'फायटर' (Fighter) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दणदणीत कमाई केली. गतवर्षात दीपिकाचे 'जवान' (Jawan) आणि 'पठाण' (Pathaan) हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. दीपिकाचा अजय देवगन स्टारर 'सिंघम अगेन' (Singham Again) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार अजय देवगनच्या 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटातही अभिनेत्री झळकणार आहे. 

Web Title: Alia Bhatt shows support for Deepika Padukone amid trolling around her baby bump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.