Ranbir Kapoor Alia Bhatt wedding: सलमान ते कंगना या सेलेब्सना नाही लग्नाचे निमंत्रण, कारण वाचून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 20:26 IST2022-04-07T18:01:01+5:302022-04-07T20:26:34+5:30
या लग्नात कोणते सेलिब्रिटी सहभागी यांची यादी तर समोर आली होतीच पण आता या लग्नाचं कुणाला आमंत्रण देण्यात येणार नाही तीही यादी समोर आलीय.

Ranbir Kapoor Alia Bhatt wedding: सलमान ते कंगना या सेलेब्सना नाही लग्नाचे निमंत्रण, कारण वाचून व्हाल थक्क
गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. ही जोडी नेमकी कधी लग्नगाठ बांधणार याकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत. दोघांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. प्री-वेडिंग आणि लग्नाच्या तारखा 13 ते 17 एप्रिल दरम्यान आहे. या लग्नात कोणते सेलिब्रिटी सहभागी यांची यादी तर समोर आली होतीच पण आता या लग्नाचं कुणाला आमंत्रण देण्यात येणार नाही तीही यादी समोर आलीय. जाणून घेऊया त्यांची नावं आणि त्यामागील कारण
सलमान खान
सलमान खानला लग्नाचं निमंत्रण देणार का? निमंत्रण दिल्यास सलमान या लग्नाला जाणार का? असे अनेक प्रश्न यावेळी चाहत्यांच्या मनात आहेत. वास्तविक, सलमान आणि रणबीरमध्ये यांचं नातं फार काही बरं नाही, हे कोणापासून लपून राहिलेले नाही. विशेषत: कतरिनाला रणबीरने डेट केल्यानंतर सलमान आणि रणबीरमधील दुरावा खूप वाढला आहे.
कतरिना कैफ
कतरिना कैफ आणि रणबीर कपूर एकेकाळी रिलेशनशीपमध्ये होते. दोघे 6 वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये होते. ब्रेकअपनंतर दोघांनी एकमेकांपासून काही अंतर ठेवले आहे.
कंगना राणौत
आलिया भट अनेकदा कंगना राणौतच्या निशाण्यावर असते. ती आलियाला ट्रोल करत असते, विशेषत: नेपोटिझमबद्दल. कंगना गंगूबाई काठियावाडीबद्दलही खूप काही बोलली होती, त्यामुळे कंगनाला या लग्नाचं निमंत्रण मिळणं कठीणच आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट यांनी करिअरच्या सुरुवातीच्या काळात एकमेकांना डेट केले होते. त्यामुळे सिद्धार्थ या लग्नाला गेला नाही तर नवल वाटणार नाही.
गोविंदा
जग्गा जासूसमुळे गोविंदा आणि रणबीर कपूर यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. खरंतर या चित्रपटात गोविंदाचा कॅमिओ होता पण नंतर तो या चित्रपटात दाखवला गेला नाही, यासाठी गोविंदाने निर्मात्यांना दोष दिला आणि रणबीर या चित्रपटाचा नायक असल्याने दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.