नमस्कार...! लंडनच्या 'बाफ्टा' अवॉर्ड्समध्ये आलिया भटने जिंकलं मन, स्टेजवर येताच म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 11:08 IST2026-02-23T11:07:29+5:302026-02-23T11:08:24+5:30

आलिया भटच्या लूकचीही होतेय चर्चा

alia bhatt debut at bafta in london presented award for non english film her speech gained attention | नमस्कार...! लंडनच्या 'बाफ्टा' अवॉर्ड्समध्ये आलिया भटने जिंकलं मन, स्टेजवर येताच म्हणाली...

नमस्कार...! लंडनच्या 'बाफ्टा' अवॉर्ड्समध्ये आलिया भटने जिंकलं मन, स्टेजवर येताच म्हणाली...

अभिनेत्री आलिया भटसाठी हे वर्षही खास आहे. नुकतंच तिने ब्रिटिश अॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स अवॉर्ड्स(बाफ्टा)मध्ये पदार्पण केलं. लंडनच्या रॉयल फेस्टिवल हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला आलिया भटने केलेल्या लूकवर चाहते फिदा आहेत. तसंच आलियाने स्टेजवर जाऊन अवॉर्ड प्रेझेंटही केलं. यावेळी तिने आधी नमस्कार... म्हणत हिंदीतून बोलायला सुरुवात केली. तिच्या दोन वाक्यांवर टाळ्यांचा कडकडाट झाला. काय म्हणाली आलिया?

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

आलिया भटने 'बाफ्टा'मध्ये पदार्पण केल्याने ती चर्चेत आली आहे. 'बेस्ट नॉन इंग्लिश फिल्म' कॅटेगरीतील अवॉर्ड प्रेझेंट करण्यासाठी आलिया स्टेजवर आली. त्याआधी तिने केलेल्या छोट्या भाषणातूनही सर्वांचं मन जिंकलं. ती म्हणाली,'नमस्कार...अगला अवॉर्ड एक ऐसी फिल्म के लिए है, जो अंग्रेजी मे नही है!' नंतर ती इंग्रजीत म्हणाली, 'लगेच सबटायटल बघायला जाऊ नका. मी हिंदीमध्ये हेच सांगत होते की पुढील अवॉर्ड हा इंग्रजी नाही तर दुसऱ्या भाषेतील सिनेमासाठी आहे. कारण सिनेमा अगणित भाषांमधून बनतो. म्हणूनच आपण कायम सिनेमा हीच भाषा साजरी करतो आणि तीही अगदी स्पष्ट उच्चारतो.."


आलियाच्या या स्पीचवर टाळ्यांचा कडकडाट झाला. लंडनच्या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात आलिया भटला भारताचं प्रतिनिधित्व करताना पाहून देशाचीही मान उंचावली. या खास प्रसंगासाठी आलियाने प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मुनरोसाठी लूक केला होता. तिने कस्टम सिल्व्हर गुची शिमरी गाऊन कॅरी केला होता. या बॅकलेस आउटफिटवर तिने व्हाईट फर स्टोल घेतला होता. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसली. आलियाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत ज्यावर इंडस्ट्रीतील अनेकांनी तिच्या लूकची स्तुती केली आहे. आलियाची सासू नीतू कपूर, तसंच आई सोनी राजदान यांनीही कमेंट केली आहे. 


दरम्यान या सोहळ्यासाठी बॉलिवूडमधून फरहान अख्तरही उपस्थित होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी शिबानी दांडेकरही दिसली. फरहानच्या एक्सेल एंटरटेन्मेंट अंतर्गत बनलेल्या 'बुंग' सिनेमालाही या सोहळ्यात 'बेस्ट चिल्ड्रन अँड फॅमिली फिल्म कॅटेगरीत' नामांकन होतं. 

Web Title : लंदन बाफ्टा में आलिया भट्ट के भाषण ने जीता दिल।

Web Summary : आलिया भट्ट ने लंदन में बाफ्टा में अपनी शुरुआत की, जहाँ उन्होंने पुरस्कार प्रस्तुत किया। उन्होंने 'नमस्ते' से भाषण शुरू किया और हिंदी में बात की। उन्होंने सिनेमा की सार्वभौमिक भाषा पर जोर दिया, तालियों से स्वागत हुआ, और एक शानदार चांदी का गाउन पहना।

Web Title : Alia Bhatt's heartfelt speech at BAFTA wins hearts in London.

Web Summary : Alia Bhatt debuted at the BAFTAs in London, presenting an award. She began her speech with 'Namaste,' then spoke in Hindi. She emphasized cinema's universal language, celebrated with applause, and wore a stunning silver gown.