"..तर मला इंडस्ट्रीतून बाहेर फेकलं जाईल"; 'छावा'च्या रिलीजआधी अक्षय खन्नाने केलेलं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:50 IST2025-03-26T13:49:41+5:302025-03-26T13:50:06+5:30
अक्षय खन्नाने एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. यात अक्षयने सध्याच्या फिल्म इंडस्ट्रीबद्दल त्याचं परखड मत व्यक्त केलंय (akshaye khanna, chhaava)

"..तर मला इंडस्ट्रीतून बाहेर फेकलं जाईल"; 'छावा'च्या रिलीजआधी अक्षय खन्नाने केलेलं मोठं वक्तव्य
'छावा' सिनेमामुळे अभिनेता अक्षय खन्ना चांगलाच चर्चेत आहे. जितकं कौतुक विकीने 'छावा'मध्ये (chhaava movie) साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला मिळालं तितकीच प्रशंसा औरंगजेबाच्या भूमिकेतील अक्षय खन्नालाही (akshaye khanna) मिळाली. स्टारकिड असूनही स्वतःचं प्रमोशन न करणारा, कोणत्याही पार्टीत-इव्हेंट किंवा पुरस्कार सोहळ्यात न दिसणारा अक्षय खन्ना प्रसिद्धी आणि लोकप्रियतेपासून काहीसा अलिप्त असतो. अशातच एका मुलाखतीत अक्षय खन्नाने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.
..तर मी इंडस्ट्रीतून बाहेर जाणं पसंत करेल- अक्षय खन्ना
अक्षय खन्नाची एक मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आहे. यात अभिनेत्याने त्याचं परखड आणि स्पष्ट मत व्यक्त केलंय. अक्षय म्हणाला की, "तुम्ही किंवा इतर कोणीही मला सांगितलं की, मी माझा स्वभाव बदलावा. वारंवार मला कोणत्याही पार्टीत, मुलाखतीत, वादात सहाभागी होऊन काही ना काही कारणाने फक्त चर्चेत राहायचंय. मला हे करावेच लागेल नाहीतर मी फिल्म इंडस्ट्रीतून बाहेर फेकला जाईल. यावर मी सांगेन की, अशी परिस्थिती असेल तर मला इंडस्ट्रीतून बाहेर जायला आवडेल. सतत चर्चेत राहण्यापेक्षा मला इंडस्ट्रीला रामराम ठोकायला जास्त आवडेल. कारण मी या गोष्टींसाठी स्वतःला नाही बदलू शकत. मी जसा आहे तसा आहे."
अक्षय खन्नाच्या या भूमिका गाजल्या
अक्षय खन्ना गेली अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. अक्षय खन्नाने आजवर साकारलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या. अक्षय खन्नाने 'दिल चाहता है', 'गांधी माय फादर', 'हलचल', 'हंगामा', 'दृश्यम २' अशा सिनेमांमध्ये साकारलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या. सध्या 'छावा' सिनेमात अक्षयने साकारलेली औरंगजेबाची भूमिका चांगलीच चर्चेत आहे.