Ved : 'माझा भाऊ' म्हणत अक्षय कुमारकडून रितेश देशमुखच्या नव्या वाटचालीसाठी मराठमोळ्या शुभेच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 17:00 IST2022-11-25T09:32:51+5:302022-12-01T17:00:32+5:30
वेडच्या जबरदस्त टीझरमधुन रितेश आणि जेनेलियाने चाहत्यांना वेडच लावलंय इतकी ही जोडी प्रेमात पाडणारी आहे. विशेष म्हणजे जेनेलियाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. तर रितेशने पहिल्यांदाच दिग्दर्शन करणार आहे.

Ved : 'माझा भाऊ' म्हणत अक्षय कुमारकडून रितेश देशमुखच्या नव्या वाटचालीसाठी मराठमोळ्या शुभेच्छा!
रितेश देशमुख चा बहुचर्चित सिनेमा 'वेड' चे Teaser टीझर पाहून चाहतेच नाही तर सेलिब्रिटी सुद्धा रितेशचे कौतुक करत आहेत. वेडच्या जबरदस्त टीझरमधुन रितेश आणि जेनेलियाने चाहत्यांना वेडच लावलंय इतकी ही जोडी प्रेमात पाडणारी आहे. विशेष म्हणजे जेनेलियाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. तर रितेशने पहिल्यांदाच दिग्दर्शन करणार आहे. हे टीझर रितेशचा खास मित्र, बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमार ने शेअर करत खास मराठी अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षय कुमार म्हणतो, 'माझा भाऊ आणि ॲक्टर आता डिरेक्टर झालाय. त्याने दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी सिनेमाचा टिझर पाहिला आणि खरंच सांगतो मला वेड लागलं.
तुम्हीही पहा तुम्हालाही लागेल….. वेड !'
रितेश आणि फराह खान यांचेही नाते एकदम खेळीमेळीचे आहे. फराहनेही रितेशला वेडचे टीझर शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलियानं 2003 मध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं. या चित्रपटात जेनेलियासोबत अभिनेता रितेश देशमुखनं मुख्य भूमिका साकरली होती. जेनेलिया आणि रितेश देशमुख आज बॉलिवूडचे क्यूट कपल म्हणून ओळखले जातात. कायमच ते सोशल मीडियावर सक्रिय असलेले पहायला मिळतात. आता, 'वेड' चा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. यात दोघेही प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. दरम्यान, रितेशचा हा चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.