'धुरंधर' पाहून भारावला अक्षय कुमार! अभिनेत्याकडून चित्रपटाचं भरभरून कौतुक, म्हणाला-"अशा ताकदीच्या कथा…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:59 IST2025-12-11T11:50:39+5:302025-12-11T11:59:55+5:30
रणवीर सिंगच्या 'धुरंधर'साठी अक्षय कुमारची खास पोस्ट, कौतुक करत म्हणाला...

'धुरंधर' पाहून भारावला अक्षय कुमार! अभिनेत्याकडून चित्रपटाचं भरभरून कौतुक, म्हणाला-"अशा ताकदीच्या कथा…"
Akshay Kumar Praises Dhurandhar: बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीतील एक नाव म्हणजे आदित्य धर. त्याच्या प्रत्येक सिनेमाची चर्चा होतेच. नुकताच आदित्य धरचा धुरंधर हा एक्शन स्पाय थ्रिलर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने इंडियन बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे.या चित्रपटात रणवीर सिंग,सारा अर्जुन,अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत.'धुरंधर' सुद्धा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अँक्शन चित्रपट आहे.
Watched Dhurandhar and I’m blown away. What a gripping tale and you’ve simply nailed it @AdityaDharFilms . We need our stories to be told in a hard-hitting way and I’m so glad the audiences are giving the film all the love it deserves. 👏🏻👏🏻👏🏻
— Akshay Kumar (@akshaykumar) December 10, 2025
सध्या सगळीकडेच धुरंधर या सिनेमाची चर्चा होत असून, अनेकांकडून सिनेमाचं कौतुकही होताना दिसत आहे. दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा, हृतिक रोशन यांसह अनेक कलाकारांनी धुरंधर चित्रपटाचं कौतुक केलं आहे. इतकंच नव्हे, तर अनेक बॉलीवूड आणि मराठी कलाकारही या चित्रपटाबद्दल बद्दल भरभरून बोलत आहेत.
त्यात आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं धुरंधर चित्रपटाचं आणि त्यातील संपूर्ण टीमचंकौतुक केलं आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अक्षय म्हणतो, ‘धुरंधर’ पाहून मी थक्क झालो. किती जबरदस्त कथा आहे आणि आदित्य धरने ती खूप छान मांडली आहे. आपल्याला अशा ताकदीच्या कथा हव्या आहेत ज्या दमदार पद्धतीने सांगितल्या जातील, आणि मला आनंद आहे कीप्रेक्षक या चित्रपटाला
त्याच पद्धतीने प्रतिसाद देत आहेत. अशी सुंदर पोस्ट अभिनेत्याने लिहिली आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टवर त्याचे लाईक्स आणि कमेंट्स करत प्रतिक्रिया देत आहेत.