बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे 'सूर्यवंशी', अक्षय-कतरिनाचं मानधन वाचून चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 14:40 IST2021-11-15T14:39:50+5:302021-11-15T14:40:24+5:30
Sooryavanshi : कतरिना (Katrina Kaif) आणि अक्षय (Akshay Kumar) सोबतच रणवीर सिंह आणि अजय देवगन यांनीही या सिनेमात काम केलं आहे. सिनेमाच्या कमाईसोबतच अक्षय आणि कतरिनाने या सिनेमासाठी किती पैसे घेतले याचीही चर्चा होत आहे.

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे 'सूर्यवंशी', अक्षय-कतरिनाचं मानधन वाचून चक्रावून जाल
अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) चा 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत आहे. सिनेमाला पहिल्या दिवशीच बंपर ओपनिंग मिळालं होतं. आता दिवसेंदिवस कमाईचा आकडा वाढतच चालला आहे. सिनेमातील जवळपास सगळेच स्टार्स महागडे आहे. कतरिना आणि अक्षय सोबतच रणवीर सिंह आणि अजय देवगन यांनीही या सिनेमात काम केलं आहे. सिनेमाच्या कमाईसोबतच अक्षय आणि कतरिनाने या सिनेमासाठी किती पैसे घेतले याचीही चर्चा होत आहे.
किती घेतली अक्षय आणि कतरिनाने फी
एका रिपोर्टनुसार, अक्षय कुमारनेसूर्यवंशी सिनेमात काम करण्याचं मानधन २५ कोटी रूपये घेतलं आहे. तर कतरिना कैफने सिनेमासाठी १० कोटी रूपये मानधन घेतलं. अक्षयने सिनेमात पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली आहे. तेच कतरिनाने त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. दोघांचीही केमिस्ट्री फॅन्सना खूप आवडली.
अजय आणि रणवीरने फ्रीमद्ये केलं काम?
'सूर्यवंशी' मध्ये अजय देवगन (Ajay Devgn) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हेही दिसले आहेत. मात्र, त्यांनी या सिनेमासाठी एक रूपयाही मानधन घेतलं नसल्याची चर्चा आहे. त्यांनी फ्रीमध्ये काम केल्याचं बोललं जात आहे. तेच जॅकी श्रॉफने १ कोटी तर जावेद जाफरीने ५० लाख रूपये मानधन घेतलं आहे.
सूर्यवंशी सिनेमाला फार चांगला प्रतिसाद मिळत आहे. सूर्यवंशीने आतापर्यंत १५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. सिनेमाने दुसऱ्या रविवारी १० कोटींपेक्षा जास्तचं कलेक्शन केलं आहे. देशासह परदेशातही सूर्यंवंशीला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे.