Video: झणझणीत पुणेरी मिसळवर अक्षयने मारला ताव; आजुबाजूच्या लोकांचाही पडला त्याला विसर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 14:00 IST2022-08-05T13:59:59+5:302022-08-05T14:00:51+5:30
Akshay Kumar: सध्या सोशल मीडियावर अक्षयचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय त्याचं डाएट विसरुन पुणेरी मिसळवर ताव मारताना दिसत आहे.

Video: झणझणीत पुणेरी मिसळवर अक्षयने मारला ताव; आजुबाजूच्या लोकांचाही पडला त्याला विसर
बॉलिवूडचा सर्वात फिट अभिनेता म्हणजे अक्षय कुमार (akshay kumar). आपल्या चित्रपटांसोबतच अक्षय त्याच्या फिटनेसकडेही जातीने लक्ष देत असतो. त्यामुळे कोणत्याही पार्टी वा अन्य कार्यक्रमात खिलाडी कुमार गेल्यानंतर त्याच्या खाण्यापिण्याकडे कटाक्षाने लक्ष देतो. परंतु, पुण्यात गेलेल्या अक्षयला मिसळ खाण्याचा मोह मात्र आवरता आला नाही. डाएट वगैरे सगळं विसरुन त्याने पुणेरी मिसळवर ताव मारला.
सध्या सोशल मीडियावर अक्षयचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय त्याचं डाएट विसरुन पुणेरी मिसळवर ताव मारताना दिसत आहे. विशेष म्हणजे तो मिसळ खाण्यात इतका गुंग आहे की आपल्या आजूबाजुला काय घडतंय याचाही त्याला विसरला पडला. हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. तसंच अक्षयनेही त्याच्या पेजवर काही फोटो शेअर केले आहेत.
सध्या अक्षय त्याच्या आगामी रक्षाबंधन या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा चित्रपट येत्या ११ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे अक्षय आणि त्याची संपूर्ण टीम पुण्यामुळे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती. यावेळी अक्षयने पुणेरी मिसळवर ताव मारला. पुण्यातील ‘श्रीमंत मिसळ आणि बरंच काही’ या ठिकाणी अक्षयसह त्याच्या टीमने मिसळीचा आस्वाद घेतला.
'प्रत्येक पुणेकराची जान आणि शान, मिसळ पाव! मनानंतर आता आमचं पोटही पूर्णपणे भरलं आहे', असं कॅप्शन देत अक्षयने हे फोटो शेअर केले. सोबतच त्याने श्रीमंत मिसळ आणि बरंच काही यांचे आभारही मानले.
दरम्यान, रक्षाबंधन या चित्रपटात अक्षयसोबत भूमी पेडणेकर स्क्रीन शेअर करणार आहे. आनंद एल राय यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.