"आजचाच दिवस जेव्हा रिमोट कंट्रोल...", मतदान केल्यानंतर अक्षय कुमारने दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 09:21 IST2026-01-15T09:19:35+5:302026-01-15T09:21:40+5:30
अक्षय कुमारने लोकांना केलं आवाहन, म्हणाला...

"आजचाच दिवस जेव्हा रिमोट कंट्रोल...", मतदान केल्यानंतर अक्षय कुमारने दिली प्रतिक्रिया
आज मुंबईसह राज्यातल्या २९ महानगरपालिकांसाठी मतदान होत आहे. नेते मंडळी, सेलिब्रिटी आणि सामान्य नागरिक सर्वच मतदान करायला बाहेर पडत आहेत. नेहमीप्रमाणे सकाळी सर्वात आधी मतदान करायला अक्षय कुमार पोहोचला. बांद्रा येथील केंद्रावर त्याने मतदान केलं. बाहेर आल्यानंतर त्याने माध्यमांशी संवाद साधला. मतदानाचं महत्व त्याने नागरिकांना पटवून सांगितलं. काय म्हणाला अक्षय कुमार?
एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत अक्षय कुमार म्हणाला, "आज महानगरपालिकेचं मतदान आहे. मुंबईकर म्हणून मी सुद्धा मत दिलं आहे. आजचाच दिवस आहे जेव्हा रिमोट कंट्रोल आपल्या हातात असतं. त्यामुळे मी सर्व मुंबईकरांना हेच सांगेन की मतदान करा. आपण एरवी पाणी नाही, वीज नाही, रस्त्यांचा वाईट अवस्था आहे, कचरा जमा झालाय अशा तक्रारी करत असतो. शक्य तितकं एकूण एक व्यक्तीने मतदान करावं आणि योग्य उमेदवाराला निवडून द्यावं. मुंबईकरांचा असली हिरो व्हायचं असेल तर डायलॉगबाजीला महत्व नाही तर बाहेर पडून मतदान करा."
#WATCH | Mumbai: After casting his vote, Actor Akshay Kumar says, "Today, the voting for BMC is taking place. As Mumbaikars, we have the remote control with us today. I would request all the people of Mumbai to come out in large numbers and cast their votes. If we have to be the… https://t.co/AOlWRmnx1Vpic.twitter.com/19RmBgMFB7
— ANI (@ANI) January 15, 2026
मतदान झाल्यानंतर अक्षय कुमारजवळ एक मुलगी येते. 'बाबांवर मोठं कर्ज आहे' असं म्हणत ती अक्षयला काही कागद दाखवते. यानंतर अक्षय तिला 'तुझा नंबर देऊन ठेव' असं सांगतो. ती मुलगी अक्षयच्या पाया पडते. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अक्षयने त्या मुलीचं ऐकून घेतलं यामुळे त्याचं कौतुकही होत आहे.
अक्षय कुमारसोबत पत्नी ट्विंकल खन्नानेही मतदान केलं. यानंतर सचिन तेंडुलकर, सान्या मल्होत्रा हे काही सेलिब्रिटीही मतदान करायला केंद्रावर पोहोचले.