चुरा के दिल मेरा! अक्षय कुमार-शिल्पा शेट्टी ३० वर्षांनी एकाच स्टेजवर; नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 11:58 IST2025-03-04T11:56:59+5:302025-03-04T11:58:31+5:30
अक्षय शिल्पाची प्रेम कहाणी सर्वांना माहितच आहे. ३० वर्षांच्या मोठ्या काळानंतर दोघं एकत्र स्टेजवर दिसले.

चुरा के दिल मेरा! अक्षय कुमार-शिल्पा शेट्टी ३० वर्षांनी एकाच स्टेजवर; नेटकरी म्हणाले...
बॉलिवूडमध्ये गाजलेल्या प्रेम प्रकरणांपैकी एक अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि शिल्पा शेट्टीचं (Shilpa Shetty)अफेअर. ९० च्या दशकात या दोघांची रोमँटिक जोडी हिट होती. 'धडकन','मै खिलाडी तू अनाडी' सिनेमांमध्ये दोघांची जोडी झळकली. शिल्पा अक्षयच्या प्रेमात होती मात्र नंतर अक्षयने तिचा विश्वासघात केला आणि त्यांचं ब्रेकअप झालं. शिल्पा आणि अक्षयची जोडी तुटली. नंतर ते पुन्हा कधीच सोबत दिसले नाहीत. तसंच शिल्पाने अक्षयवर काही आरोपही केले होते. मात्र काल ३० वर्षांनी शिल्पा आणि अक्षय एकाच स्टेजवर आले. त्यां पाहून नेटकरीही चकीत झालेत.
काल ३ मार्च रोजी मुंबईत आयोजित एका इव्हेंटमध्ये काही कलाकार पोहोचले होते. यावेळी शिल्पा आणि अक्षयही त्याच ठिकाणी आले होते. सर्वजम व्हाईट आऊटफिटमध्ये होते. शिल्पा पांढऱ्या नेट साडीत खूप सुंदर दिसत होती. तर अक्षयही व्हाईट सूट बूटमध्ये डॅशिंग दिसत होता. दोघंही स्टेजवर असताना त्यांनी चक्क 'चुरा के दिल मेरा..' या त्यांच्या आयकॉनिक गाण्यावर डान्स केला. दोघांनीही तीच स्टेप करत गाणं रिक्रिएट केलं. हुक स्टेप केल्यानंतर शिल्पा म्हणते, 'झालं..झालं..'. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Akki & Shilpa 😍❤️💓
— AKSHAYKUMARNEWS 🇮🇳 (@Akkian_Gauravv) March 4, 2025
This is called shocking reunion 💥❤️ #AkshayKumar𓃵#akshaykumar#ShilpaShettypic.twitter.com/g9iYsXmulO
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. 'ट्विंकल खन्ना लाटणं घेऊन तयार आहे', 'ब्रेकअपनंतर हे लोक एकमेकांसमोर कसे येतात','दोघांनी पुन्हा सिनेमात एकत्र काम केलं पाहिजे' अशा प्रतिक्रिया युजर्सने दिल्या आहेत.
अक्षय आणि शिल्पाचं अफेअर त्याकाळी खूप गाजलं होतं. शिल्पाने मुलाखतींमध्ये अक्षयवरचं प्रेमही व्यक्त केलं होतं. मात्र नंतर अक्षयने तिचा विश्वासघात केला. यानंतर शिल्पा पूर्णत: खचली होती. 'दुसरी मिळाली म्हणून मला सोडलं'असे आरोप तिने अक्षयवर केले होते. 'या माणसासोबत मी परत कधी काम करणार नाही' असंही तिने स्पष्ट केलं होतं.' २००१ साली अक्षयने ट्विंकल खन्नासोबत लग्न केलं. तर २००९ साली शिल्पा राज कुंद्रासोबत लग्नबंधनात अडकली.