अक्षय कुमार अन् कतरीना कैफकडून चाहत्यांना होळीची खास भेट, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 17:34 IST2025-03-05T17:34:19+5:302025-03-05T17:34:46+5:30

अक्षय-कतरीनाकडून त्यांच्या चाहत्यांना होळीची खास भेट मिळणार आहे. 

Akshay Kumar And Katrina Kaif's Film Namastey London To Re-release | अक्षय कुमार अन् कतरीना कैफकडून चाहत्यांना होळीची खास भेट, जाणून घ्या

अक्षय कुमार अन् कतरीना कैफकडून चाहत्यांना होळीची खास भेट, जाणून घ्या

 Akshay Kumar And Katrina Kaif: सध्या जुने लोकप्रिय चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू आहे. वर्ष २०२४ मध्ये अशा चित्रपटांचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. २०२५ मध्येही हा ट्रेंड सुरूच आहे. जुने सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतरही आता प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिलाय. अनेक बॉलिवूड चित्रपटांनी री-रिलीजमध्ये कोट्यवधींची कमाई केली आहे. आता आणखी एक सिनेमा थिएटरमध्ये री-रिलीज होत आहे. हा सिनेमा आहे 'नमस्ते लंडन'.

अक्षय कुमार आणि कतरीना कैफ या जोडीने आजवर बरेच लोकप्रिय चित्रपट दिले आहेत. 'नमस्ते लंडन' हा चित्रपट त्यापैकीच एक आहे. या रोमँटिक कॅामेडी चित्रपटातील अक्षय-कतरीनाची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. सध्या सुरू असलेल्या चित्रपट पुर्नप्रदर्शित करण्याच्या लाटेत 'नमस्ते लंडन' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १८ वर्षांनी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहे. अक्षय-कतरीनाकडून त्यांच्या चाहत्यांना पुढल्या आठवड्यात या चित्रपटाच्या रूपात होळीची खास भेट मिळणार आहे. 

अक्षयने याबाबत सोशल मीडियावर लिहिलं की, 'नमस्ते लंडन' हा चित्रपट या होळीला पुन्हा प्रदर्शित होत असल्याचे सांगताना खूप आनंद होत आहे. चला पुन्हा एकदा सुमधूर गीत-संगीत, स्मरणीय संवाद आणि टाइमलेस रोमान्सचा आनंद घेऊया. भेटू सिनेमागृहांमध्ये". अक्षयने ही घोषणा (Akshay Kumar Announces Namastey London Re-release) करताच त्याचे खूश झाले आहेत. नमस्ते लंडन' २००७ मध्ये हा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता.


अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो शेवटचा 'स्काय फोर्स' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. तसेच कतरिना कैफच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर ती शेवटी 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर साऊथ अभिनेता विजय सेतुपती दिसला होता. आता पुढं ती आगामी चित्रपट वरुण धवनबरोबर दिसणार आहे.

Web Title: Akshay Kumar And Katrina Kaif's Film Namastey London To Re-release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.