कमल हसनच्या मुलीने चार वर्षाआधीच बदलला होता धर्म, स्वत;ला सांगितलं होतं नास्तिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 17:19 IST2021-10-12T17:15:46+5:302021-10-12T17:19:22+5:30
Akshara Haasan Birthday : अक्षरा हसनने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे आणि चांगल्या सिनेमासोबत तिचं नाव जोडलं आहे.

कमल हसनच्या मुलीने चार वर्षाआधीच बदलला होता धर्म, स्वत;ला सांगितलं होतं नास्तिक
साउथ इंडियन सिने इंडस्ट्रीतील सुपरस्टार कमल हसन (Kamal Haasan) यांची लहान मुलगी अक्षरा हसन (Akshara Haasan) चा आज वाढदिवस. अक्षरा हसन (Akshara Haasan Birthday) आज ३० वर्षाची झाली आहे. केवळ साउथच्याच नाही तर काही बॉलिवूड सिनेमातूनही अक्षराने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अक्षरा हसनने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे आणि चांगल्या सिनेमासोबत तिचं नाव जोडलं आहे.
अक्षरा हसनचा संबंध फिल्मी परिवाराशी असल्याने तिचीही आवड अभिनयात होतीच. अक्षराने तिच्या करिअरची सुरूवात सह-दिग्दर्शक म्हणून केली. ती राहुल ढोलकियासोबत बरेच वर्ष सह-दिग्दर्शक म्हणून काम करत होती. त्यानंतर तिने अभिनयाची सुरू केली. तिने 'शमिताभ' सिनेमातून डेब्यू केलं होतं. हा सिनेमा फार चालला नाही. त्यानंतर २०१५ मध्ये ती 'लाली की शादी में लड्डू दीवाना' मध्ये दिसली होती.
खाजगी फोटो झाले होते लीक
अक्षराचे काही खाजगी फोटो लीक झाले होते. त्यामुळे वादळ उठलं होतं. त्यावेळी ती म्हणाली होती की, 'माझे काही खाजगी फोटो लीक झाले आहेत. हे कुणी आणि का केलं मला नाही माहीत. पण एखाद्या तरूणीला आपल्या मनोरंजनासाठी अशाप्रकारे त्रास देणं दुर्भाग्यपूर्ण आहे. यामुळे मला दु:खं झालं आहे'
अक्षराने बदलला धर्म
स्वत:ला नास्तिक सांगणारी अक्षरा हसनने २०१७ मध्ये आपला धर्म बदलला. अक्षऱाने हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. धर्म बदलण्यावर अक्षऱाचं मत होतं की, तिने स्वत: बोद्ध धर्मावर विश्वास ठेवला नंतर हे पाउल उचललं.