Ajit Pawar Death: अजित पवारांचं निधन, बॉलिवूड हळहळले! शेअर केल्या भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 14:11 IST2026-01-28T14:10:55+5:302026-01-28T14:11:20+5:30

Bollywood Celebs Mourn Ajit Pawar's Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे विमान अपघातात दु:खद मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनानंतर कलाकारांनी शोक व्यक्त केलाय.

Ajit Pawar Death Plane Crash Actors Pay Condolence Shares Emotional Post | Ajit Pawar Death: अजित पवारांचं निधन, बॉलिवूड हळहळले! शेअर केल्या भावनिक पोस्ट

Ajit Pawar Death: अजित पवारांचं निधन, बॉलिवूड हळहळले! शेअर केल्या भावनिक पोस्ट

महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी घटना आज सकाळी बारामतीत घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. विमान लँडिंगवेळी अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी बारामतीत जात असताना त्यांचा दुर्देवी अपघात झाला. त्यांच्या निधनानंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे.  नेतेमंडळींसह सिनेसृष्टीतील कलाकारांनाही अश्रू अनावर झाले आहे. बॉलिवूडमधील काही कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून श्रध्दांजली वाहिली आहे.

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणनं भावुक पोस्ट शेअर केली आहे. त्यानं लिहलं,"उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाने धक्का बसला आणि दुःख झालं. त्यांच्या कुटुंबियांना, प्रियजनांना आणि या मोठ्या नुकसानाने प्रभावित झालेल्या सर्वांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो".

दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करत अजित पवार यांना श्रध्दांजली वाहिली आहे. त्यांनी लिहलं "महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाने खूप मोठा धक्का बसला आणि दुःख झाले आहे. जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटलो, तेव्हा ते खूप सज्जन आणि दयाळू होते! माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. ओम शांती!".

अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरनं "अत्यंत दुखद... भावपूर्ण श्रद्धांजलि... ओम शांति" या शब्दात अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर अभिनेते रवी किशन यांनी सोशल मीडियावरून श्रध्दांजली वाहिली. त्यांनी लिहलं, "महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली. मी भगवान श्री राम यांच्याकडे त्यांच्या आत्म्यांना शांती आणि शोकाकुल कुटुंबांला हे मोठे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना करतो. ओम शांती".

 

अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत हिने दुःख व्यक्त केले आहे. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना ती म्हणाली,""हे अत्यंत भयावह आहे. ही बातमी अतिशय धक्कादायक असून मला खूप वाईट वाटतंय... एकदा का मी स्वतःला आणि माझ्या भावनांना सावरलं की, त्यानंतर मी माझं सविस्तर विधान देईन".
 

प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार अरुण गोविल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बारामतीजवळ झालेल्या विमान अपघाताच्या घटनेने ते व्यथित झाले असून त्यांनी एक्सच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. अरुण गोविल म्हणाले, "बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने मला प्रचंड दुःख झाले आहे. त्यांनी अत्यंत जिद्दीने आणि आपल्या अनुभवाच्या जोरावर सार्वजनिक जीवनात सेवा केली. या कठीण प्रसंगी माझे विचार त्यांच्या कुटुंबासोबत आणि प्रियजनांसोबत आहेत. ओम शांती!"
 


अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामतीकडं जाण्यासाठी खासगी विमानाने निघाले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांच्या आज बारामतीमध्ये चार सभांचे आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी ८:४५ ते ९:०० च्या सुमारास लँडिंग करत असताना विमानाला तांत्रिक अडचण आली. अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने दिलेली माहिती अंगावर शहारे आणणारी आहे. 

त्यांनी सांगितले की, "स्वतःच्या डोळ्यांनी हा अपघात पाहिला. खूप दुःखद घटना होती. विमान लँडिंगसाठी खाली येत होते, तेव्हाच काहीतरी अघटित घडणार याची जाणीव झाली. विमान खाली येताना वाटत होतं की ते कोसळेल आणि तितक्यातच ते कोसळले आणि त्यात फोटो स्फोट झाला. आम्ही मदतीसाठी धावलो, पण विमानाने भीषण पेट घेतला होता. आम्ही जवळ पोहोचलो तेव्हा विमानात एकापाठोपाठ एक ४ ते ५ भीषण स्फोट झाले. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. 

 

Web Title : अजित पवार का निधन: बॉलीवुड में शोक, भावुक पोस्ट साझा

Web Summary : बारामती के पास एक विमान दुर्घटना में उपमुख्यमंत्री अजित पवार का दुखद निधन हो गया। बॉलीवुड सितारों ने शोक व्यक्त किया और हार्दिक संवेदनाएं साझा कीं। अजय देवगन, अनुपम खेर, उर्मिला मातोंडकर, रवि किशन, कंगना रनौत और अरुण गोविल ने शोक व्यक्त किया।

Web Title : Ajit Pawar's Demise: Bollywood Mourns, Shares Emotional Posts

Web Summary : Deputy CM Ajit Pawar tragically died in a plane crash near Baramati. Bollywood stars expressed grief and shared heartfelt condolences. Ajay Devgn, Anupam Kher, Urmila Matondkar, Ravi Kishan, Kangana Ranaut, and Arun Govil mourned the loss.