Raid 2 चित्रीकरण सुरु होताच अजय देवगणने मानले रवि तेजाचे आभार; नेमकं काय आहे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 14:32 IST2024-01-07T14:31:29+5:302024-01-07T14:32:24+5:30
Ajay devgn: अजयने त्याच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.

Raid 2 चित्रीकरण सुरु होताच अजय देवगणने मानले रवि तेजाचे आभार; नेमकं काय आहे प्रकरण
मागच्या काही वर्षांत अजय देवगणनेबॉलिवूडला एकाहून एक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. त्यामुळे मागची २-३ वर्ष अजयसाठी खास ठरली आहेत. यामध्ये आता लवकरच तो Raid 2 या आगामी सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार रवि तेजा सुद्धा अजयसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे नुकतंच या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात झाली असून अजयने रवि तेजाचे आभार मानले आहेत.
Raid 2 हा २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या रेड या सिनेमाचा पुढील पार्ट आहे. या सिनेमात अजय देवगण पुन्हा एकदा IRS अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. इतकंच नाही तर यावेळी त्याच्यासोबत रवि तेजा सुद्धा स्क्रीन शेअर करणार आहे. अजयने सोशल मीडियावर नुकताच या सिनेमाच्या मुहूर्त सोहळ्याचा फोटो शेअर केला आहे.
रेड २ च्या शुटिंगला आज ऑफिशिअलरित्या सुरुवात झाली आहे. सेटवर सगळेच एनर्जीमध्ये आहेत. रवि तेजा मुहूर्त शॉटसाठी आवर्जुन उपस्थिती लावण्यासाठी खूप आभार. तुझ्या येण्यामुळे या कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढली, असं कॅप्शन देत अजयने रवि तेजाचे आभार मानले आहेत.
दरम्यान, अजयने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्यासोबत रवि तेजा, अभिषेक पाठक आणि भूषण कुमार सुद्धा दिसून येत आहेत. अजयचा रेड २ हा सिनेमा येत्या १५ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार गुप्ता करत आहेत.