‘भुलभुलय्या’ मध्ये विद्या नव्हे तर ऐश्वर्या बनणार होती ‘मंजुलिका’, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 17:36 IST2022-04-28T17:33:02+5:302022-04-28T17:36:32+5:30
Bhool Bhulaiyaa : ‘भुलभुलय्या 2’ येणार म्हटल्यावर अनेक चाहत्यांच्या आठवणी ताज्या झाल्या असणार हे नक्की. तर आज आम्ही याचबद्दल सांगणार आहोत.

‘भुलभुलय्या’ मध्ये विद्या नव्हे तर ऐश्वर्या बनणार होती ‘मंजुलिका’, पण...
तब्बल 15 वर्षांनंतर मंजुलिका परतली आहे. होय, आम्ही बोलतोय ते ‘भुलभुलय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2)या आगामी चित्रपटाबद्दल. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी लीड रोलमध्ये आहेत. कियारा अडवाणी मंजुलिकाची भूमिका साकारते आहे. तब्बूचीही खास भूमिका आहे. ती अमिषा पटेलची भूमिका जिवंत करणार आहे. येत्या 20 मे रोजी ‘भुलभुलय्या 2’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. ‘भुलभुलय्या 2’ येणार म्हटल्यावर अनेक चाहत्यांच्या आठवणी ताज्या झाल्या असणार हे नक्की. तर आज आम्ही याचबद्दल सांगणार आहोत.
2007 मध्ये ‘भुलभुलय्या’ हा सिनेमा रिलीज झाला होता. यात अक्षय कुमारने डॉ. आदित्य श्रीवास्तवची तर विद्या बालनने (Vidya Balan)अवनी आणि मंजुलिकाची भूमिका साकारली होती. सिद्धार्थ आणि अवनीच्या लग्नापासून सुरू झालेली ‘भुलभुलय्या’ची कथा एक गूढ भयकथा होती. ‘भुलभुलय्या’मुळे विद्या बालनला एक वेगळी ओळख मिळाली. आजही मंजुलिका म्हटलं की विद्या बालनचाच चेहरा डोळ्यांपुढे येतो. पण तुम्हाला माहितीये का की, मंजुलिकाच्या पात्रासाठी विद्या बालन ही पहिली पसंत नव्हती.
ऐश्वर्या होती पहिली पसंत
मंजुलिकाच्या भूमिकेसाठी विद्या नव्हे तर ऐश्वर्या राय ही मेकर्सची पहिली पसंत होती. पण मी हॉन्टेड रोल्स करणार नाही, असं म्हणत ऐश्वर्याने ही भूमिका नाकारली होती. यानंतर या चित्रपटासाठी मेकर्स राणी मुखर्जीकडे गेलेत. पण तिनेही हा चित्रपट नाकारला.अखेर विद्या बालनने या भूमिकेत इंटरेस्ट दाखवला आणि मंजुलिकाची भूमिका तिच्या वाट्याला गेली. राधाचा रोल आधी कॅटला ऑफर झाला होता... ऐकून आश्चर्य वाटेल पण अमीषा पटेलने साकारलेली राधाची भूमिका आधी कतरिना कैफला ऑफर झाली होती. मेकर्सला कतरिनाच हवी होती. पण कतरिनाने नकार दिल्यानं मेकर्सचा नाईलाज झाला आणि तिच्या जागी अमीषा पटेलची वर्णी लागली. अमीषाने या भूमिकेला पूरेपूर न्याय दिला.