ऐश्वर्या राय-बच्चनला करायचे मराठी चित्रपटात काम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2017 19:13 IST2017-06-11T13:43:44+5:302017-06-11T19:13:44+5:30
आपल्या सौंदर्य अन् अभिनयाने बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ राज करणाºया ऐश्वर्या राय-बच्चन हिला आता मराठी इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावयाचे आहे. दस्तुरखुद्द ऐश्वर्यानेच ...

ऐश्वर्या राय-बच्चनला करायचे मराठी चित्रपटात काम!
आ ल्या सौंदर्य अन् अभिनयाने बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ राज करणाºया ऐश्वर्या राय-बच्चन हिला आता मराठी इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावयाचे आहे. दस्तुरखुद्द ऐश्वर्यानेच याबाबतची कबुली दिली आहे. शनिवारी विक्रम फडणीस यांच्या पहिल्या ‘हृदयांतर’ या मराठी चित्रपटाच्या संगीत समारंभात ऐश्वर्यानेच ही इच्छा व्यक्त केली. जेव्हा ऐश्वर्याला मराठी चित्रपटात काम करण्याविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने लगेचच म्हटले की, ‘मला मराठी चित्रपटात काम करायला आवडेल. मला खरोखरच तुमचे आभार मानावेसे वाटतात की, तुम्ही उपस्थित मीडियासमोर मला हा प्रश्न विचारला.’
४३ वर्षीय ऐश्वर्याने १९९७ मध्ये ‘इरुवर’ या तामीळ चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. याविषयी ऐश्वर्या म्हणतेय की, ‘मी एक कलाकार आहे, त्यामुळे मी कुठल्या भाषेच्या चित्रपटात काम करायला हवे हे तेवढे महत्त्वाचे नाही.’ २०१५ मध्ये आलेल्या ‘जज्बा’ या चित्रपटातून वापसी करणाºया ऐश्वर्याच्या मते, ‘मी स्वत:च स्वत:साठी मार्ग तयार केला आहे. त्यामुळे चित्रपटांची निवड करताना मला कधीच अडचण आली नाही.’ हृदयांतर या चित्रपटात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, तृष्णिका शिंदे आणि निष्ठा वैद्य यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १७ जुलै रोजी रिलीज होणार आहे.
![]()
ऐश्वर्याने काही दिवसांपूर्वीच राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा ‘फन्ने खान’ हा चित्रपट साइन केला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अनिल कपूर झळकणार आहे. मात्र चित्रपटात ऐश्वर्या अनिलच्या अपोझिट असेल हे अद्यापपर्यंत निश्चित झाले नाही. ती चित्रपटात दुसरी अन् हटके भूमिका साकारू शकते, असेही बोलले जात आहे. ‘फन्ने खान’ हा एक कॉमेडी म्युझिकल चित्रपट आहे.
शिवाय २००२ मध्ये आलेल्या बेल्जियन यांनी दिग्दर्शित आणि डोमिनिक दोरूदुरे निर्मित ‘एवरीबडीज फेमस’ या इंग्लिश चित्रपटाचा रिमेक असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, चित्रपटाच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार सध्या स्क्रिप्टवर काम सुरू असून, त्यात बदल केला जाण्याचीही शक्यता आहे.