इमर्जन्सी बघण्सासाठी उत्सुक, करण जोहरच्या वक्तव्यानंतर कंगना घाबरली; म्हणाली, "खूप भीती..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 11:48 IST2023-08-23T11:47:29+5:302023-08-23T11:48:49+5:30

मणिकर्णिका वेळीही करणने असंच विधान केलं होतं.

After Karan Johar s Eager To Watch Emergency statement Kangana ranaut got scared | इमर्जन्सी बघण्सासाठी उत्सुक, करण जोहरच्या वक्तव्यानंतर कंगना घाबरली; म्हणाली, "खूप भीती..."

इमर्जन्सी बघण्सासाठी उत्सुक, करण जोहरच्या वक्तव्यानंतर कंगना घाबरली; म्हणाली, "खूप भीती..."

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहरने (Karan Johar) नुकतंच 'गदर 2' च्या यशाबद्दल सनी देओलचं कौतुक केलं. बॉलिवूड पुन्हा रुळावर येतंय याचा त्याला आनंद असल्याचंही त्याने मुलाखतीत सांगितलं. तसंच त्याच्याच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाच्या यशासाठीही प्रेक्षकांचे आभार मानले. यावेळी त्याने कंगना रणौतचा (Kangana Ranaut) आगामी 'इमर्जन्सी' (Emergency) सिनेमा पाहण्यासाठीही आतुर असल्याचं सांगितलं. करणच्या या प्रतिक्रियेवर कंगनाने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

कंगना रणौत आणि करण जोहर यांच्यातील वाद अद्यापही सुरुच आहे. कंगनाने करण जोहरला बॉलिवूडचा 'माफिया' असंच जाहीर केलं आहे. तिने आतापर्यंत करणवर अनेक आरोप केलेत. आता इमर्जन्सी सिनेमा पाहण्यासाठी आतुर असल्याचं करणने सांगितल्यावर कंगना कशी शांत बसेल. ट्वीटरवर तिने त्याला चांगलंच उत्तर दिलं आहे. ती लिहिते, "हाहा..गेल्यावेळी करणने मणिकर्णिका सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं होतं. माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट कँपेन सिनेमा रिलीजच्या वीकएंडला झालं होतं. सिनेमातील जवळपास सगळ्याच कलाकारांना माझ्यावर चिखलफेक करण्यासाठी आणि चित्रपट आपटावा यासाठी पैसे दिले गेले. माझ्या आयुष्यातील सर्वात यशस्वी विकएंड अचानक एखाद्या वाईट स्वप्नात रुपांतरित झाला."

ती पुढे म्हणाली, "हाहा..आता मी घाबरले आहे..खूप घाबरले आहे कारण तो पुन्हा सिनेमा पाहण्यासाठी आतुर झालाय." कंगनाने कुत्सितपणे करणला उत्तर दिलं आहे. कंगनाचे मागील दोन तीन वर्षात रिलीज झालेले बरेच सिनेमे फ्लॉप झाले आहेत. त्यामुळे तिला 'इमर्जन्सी' सिनेमाकडून खूप अपेक्षा आहे. यासाठी तिने आपलं घरही गहाण ठेवल्याचं सांगितलं होतं. सिनेमात अनुपम खेर, श्रेयस तळपदे यांच्याही भूमिका आहेत. कंगनाने यामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. २४ नोव्हेंबरला सिनेमा रिलीज होणार आहे.

Web Title: After Karan Johar s Eager To Watch Emergency statement Kangana ranaut got scared