Animal Park मध्ये नवा व्हिलन कोण ? समोर आलं Animal सिनेमाच्या सिक्वेलबद्दल मोठं अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 13:47 IST2024-02-29T13:45:37+5:302024-02-29T13:47:20+5:30
Animal Park मध्ये खलनायक कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Animal Park मध्ये नवा व्हिलन कोण ? समोर आलं Animal सिनेमाच्या सिक्वेलबद्दल मोठं अपडेट
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित Animal ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सिनेमात खूप जास्त हिंसा, रक्तपात असल्याने अनेकांनी जोरदार टीकाही केली आहे. बॉबी देओलला तर या चित्रपटामुळे एक वेगळी ओळखच मिळाली आहे. Animal सिनेमाचा सिक्वेल Animal Park प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Animal चित्रपटापेक्षा Animal Parkची अधिक क्रेझ असणार आहे. Animal Park मध्ये मनोरंजनाचा डोस दुप्पट असणार आहे. ज्याबद्दल एक अपडेट समोर आले आहे.
ॲनिमलच्या स्टार कास्टमध्ये अनेक मोठ्या चेहऱ्यांचा समावेश होता. या चित्रपटात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्याशिवाय अनिल कपूर, तृप्ती डिमरी आणि देखील दमदार भूमिकेत दिसले होते. आता या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये अनेक नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. ॲनिमलमध्ये बॉबी देओल हा खलनायक अबरार हकच्या भूमिकेत दिसला होता. Animal Park मध्ये खलनायक कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, विकी कौशल हा ॲनिमल पार्कमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तथापि, निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मेकर्सच्या म्हणण्यानुसार, Animal Park मध्ये पहिल्या भागापेक्षाही जास्त हिंसा दाखवण्यात येणार आहे. तसंच सर्व कलाकारही जास्त गंभीर असणार आहेत. प्रेक्षकांना Animal हाच सिनेमा इतका भयानक वाटला तर आता Animal Park वेळी काय होईल याची कल्पनाही करता येणार नाही.