अक्षय खन्नानंतर आता 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार औरंगजेब; आगामी ऐतिहासिक सिनेमाची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:08 IST2025-02-20T15:02:46+5:302025-02-20T15:08:12+5:30

अक्षय खन्नाने औरंगजेबाच्या भूमिकेत केलेल्या अभिनयाचं सर्वजण कौतुक करत आहेत. अशातच आणखी एक बॉलिवूड अभिनेता आगामी सिनेमात औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे (akshaye khanna, chhaava)

After Akshaye Khanna bobby deol will now play Aurangzeb in upcoming historical film | अक्षय खन्नानंतर आता 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार औरंगजेब; आगामी ऐतिहासिक सिनेमाची उत्सुकता

अक्षय खन्नानंतर आता 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार औरंगजेब; आगामी ऐतिहासिक सिनेमाची उत्सुकता

'छावा' सिनेमाची (chhaava movie) सध्या चांगलीच चर्चा आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी (laxman utekar) 'छावा' सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची गाथा रुपेरी पडद्यावर साकार केली. विकी कौशलने (vicky kaushal) 'छावा' सिनेमात साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका चांगलीच गाजतेय. विकी कौशलच्या तोडीस तोड अभिनेता अक्षय खन्नाने (akshaye khanna) औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. अशातच आणखी एक बॉलिवूड अभिनेता आगामी सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. तो अभिनेता कोण? जाणून घ्या.

हा अभिनेता साकारणार औरंगजेब

अक्षय खन्नाने साकारलेली औरंगजेबाची भूमिका सध्या चांगलीच गाजतेय. अशातच बॉलिवूडमध्ये 'लॉर्ड' या नावाने लोकप्रिय असलेला अभिनेता औरंगजेब साकारणार आहे. तो म्हणजे बॉबी देओल. ‘हरि हरा वीरा मल्लू’ या आगामी सिनेमात बॉबी देओल औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील बॉबी देओलचा लूकही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. बॉबी देओलने साकारलेला औरंगजेब प्रेक्षकांना कसा वाटणार, हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल.



बॉबी देओलने घेतलं तगडं मानधन

'छावा'बद्दल सांगायचं तर, अक्षय खन्नाला 'छावा' सिनेमासाठी २ कोटींचं मानधन मिळालं. अक्षय खन्नाचा जबरदस्त अभिनय पाहून सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत. दुसरीकडे मानधनाच्या बाबतीत बॉबी देओल मात्र अक्षय खन्नाच्या फार पुढे आहे. ‘हरि हरा वीरा मल्लू’ सिनेमातील औरंगजेबाच्या भूमिकेसाठी बॉबी देओलने ३ कोटी रुपयांचं मानधन घेतलंय. आता अक्षय खन्ना की बॉबी देओल, या दोघांपैकी औरंगजेबाच्या भूमिकेत खऱ्या अर्थाने कोण छाप सोडेल, हे सिनेमा आल्यावरच कळेल.
 

Web Title: After Akshaye Khanna bobby deol will now play Aurangzeb in upcoming historical film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.