"४ वर्ष मी टाईमपास केला", आदर जैनचा तारा सुतारियाकडे इशारा? नेटकरी भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 11:24 IST2025-02-20T11:22:31+5:302025-02-20T11:24:34+5:30

आदर जैन आणि अलेखा अडवाणी हिंदू पद्धतीने लग्नबंधनात अडकणार आहेत. त्याआधी तो ४ वर्ष तारा सुतारियासोबत रिलेशनशिपमध्ये होता.

adar jain says he did timepass for 4 years in his life before wedding with alekha advani | "४ वर्ष मी टाईमपास केला", आदर जैनचा तारा सुतारियाकडे इशारा? नेटकरी भडकले

"४ वर्ष मी टाईमपास केला", आदर जैनचा तारा सुतारियाकडे इशारा? नेटकरी भडकले

रणबीर कपूरचा चुलत भाऊ आदर जैन (Adar Jain) १२ जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकला. गोवा येथे त्याने बालपणीची मैत्रीण अलेखा अडवाणीसोबत त्याने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. तर आता दोघंही हिंदू रिती प्रमाणेही लग्नबंधनात अडकणार आहेत. काल दोघांचा मेहंदी सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी अख्खं कपूर कुटुंब नटून थटून आलं होतं. आदर जैन यापूर्वी तारा सुतारियासोबत रिलेशनशिपमध्ये होत. तारा आणि अलेखा चांगल्या मैत्रिणी होत्या. ताराचा विश्वासघात करत त्याने अलेखासोबत अफेअर केलं. '४ वर्ष मी टाईमपास केला आता मला प्रेम मिळालं' असं वक्तव्य नुकतंच आदरने केलं आहे.

आदर जैन आणि अलेखा अडवाणीच्या मेहंदी सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये आदर माईकवर बोलताना दिसतोय. तो म्हणतो, "मी कायमच तिच्या प्रेमात होतो. मला नेहमीच तिच्यासोबत राहायचं होतं पण तशी संधी कधी मिळाली नाही. त्यामुळे तिने मला २० वर्षांचा मोठा काळ टाईमपास करायला पाठवलं. पण अखेर आज मी या सुंदर मुलीसोबत आहे जी अगदी स्वप्नसुंदरी आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि इतकी वर्ष थांबल्याचं चीज झालं आहे. माझं नेहमीच तुझ्यावर प्रेम होतं हेच ते सीक्रेट आहे आणि मी ४ वर्ष केवळ टाईमपास केला आहे. पण आता मी तुझ्यासोबत आहे बेबी."

Adar Jain was doing time pas until he found Alekha
byu/Interesting-Ring-869 inBollyBlindsNGossip

आदर या व्हिडिओमुळे जबरदस्त ट्रोल होतोय. नेटकऱ्यांनी त्याच्यावर संताप व्यक्त केला आहे. तसंच बरं झालं ताराने याला सोडलं अशीही प्रतिक्रिया काहींनी दिली आहे. 'त्याचं अख्खं करिअरच टाईमपास आहे', 'सगळ्या मुलींना फिरवून झाल्यावर आता त्याने हिच्याशी लग्न केलं आहे. मुलीलाही स्वाभिमान नाही वाटतं' असं म्हणत नेटकऱ्यांनी अलेखालाही ट्रोल केलं आहे. आदर आणि तारा ४ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. तर अलेखा थर्ड व्हीलसारखी त्यांच्यासोबत असायची. २०२३ मध्ये आदर आणि तारा वेगळे झाले. २०२४ मध्ये आदरने अलेखाशी साखरपुडा केला.

Web Title: adar jain says he did timepass for 4 years in his life before wedding with alekha advani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.