स्वतःला शुद्ध शाकाहारी म्हणणाऱ्या अभिनेत्रीने श्रावणात खाल्लं चिकन, नेटकऱ्यांचा राग अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 10:52 IST2025-07-30T10:51:33+5:302025-07-30T10:52:05+5:30
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीने श्रावणात चिकन खाल्ल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केलीय. कोण आहे ही अभिनेत्री?

स्वतःला शुद्ध शाकाहारी म्हणणाऱ्या अभिनेत्रीने श्रावणात खाल्लं चिकन, नेटकऱ्यांचा राग अनावर
श्रावण महिन्यात मांसाहार करणारी अनेक माणसं एक - दीड महिने चिकन-मटणाला स्पर्शही करत नाहीत. अशातच स्वतःला शुद्ध शाकाहारी म्हणणाऱ्या एका बॉलिवूड अभिनेत्रीने मात्र श्रावणात चिकन खाल्ल्याने तिला ट्रोल केलं गेलंय. ही बॉलिवूड अभिनेत्री आहे उर्वशी रौतेला. उर्वशी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. एका जाहिरातीत उर्वशी चिकन खाताना दिसल्याने अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. काय घडलं नेमकं?
उर्वशीने श्रावणात चिकन खाल्लं त्यामुळे झाली ट्रोल
उर्वशीने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत ती शुद्ध शाकाहारी आहे असं म्हणाली होती. अशातच उर्वशीने एका चिकन फूड ब्रँडची जाहिरात करतानाच मांसाहार केल्याने अनेकांनी तिला खोटारडी म्हणत ट्रोल केलं. ही जाहिरात श्रावणात रिलीज झाली. हिंदू धर्मात श्रावण महिना पवित्र मानला जातो. त्यामुळे अनेक माणसं या महिन्यात मांसाहार टाळतात. याच काळात स्वतःला शाकाहारी म्हणवणाऱ्या उर्वशीने चिकन खाल्ल्याने अनेकांनी व्हिडीओखाली कमेंट करुन तिला ट्रोल केलंय.
काही युजर्सनी उर्वशीवर टीका करत सांगितलं की, "श्रावण महिन्यात चिकन खाणं योग्य आहे का?", "शाकाहारी म्हणवणारी आणि चिकन खाताना दिसणारी अभिनेत्री ही दुहेरी भूमिका का घेत आहे?" असे प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे अनेकांनी उर्वशीची ही जाहिरात बंद करावी अशी मागणी केलीय. उर्वशीने या वादावर अद्याप कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र तिच्या या विरोधाभासी कृतीमुळे अनेकांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केलीय. उर्वशी या प्रकरणावर मौन सोडणार का, याशिवाय जाहिरात मागे घेण्यात येणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.