ही अभिनेत्री अडकली रेशीमगाठीत,लग्नाचे फोटो झाले व्हायरल, मात्र यांत आहे एक ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 08:20 AM2018-03-05T08:20:38+5:302018-03-05T13:50:38+5:30

आपल्या आवडत्या कलाकाराच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी रसिक फार उत्सुक असतात.त्यांच्या जीवनातील प्रत्येक घडामोडींवर रसिकांचं बारीक लक्ष असते.विशेषतः त्यांचं ...

This actress stuck with silk, got married photos, but there is a twist | ही अभिनेत्री अडकली रेशीमगाठीत,लग्नाचे फोटो झाले व्हायरल, मात्र यांत आहे एक ट्विस्ट

ही अभिनेत्री अडकली रेशीमगाठीत,लग्नाचे फोटो झाले व्हायरल, मात्र यांत आहे एक ट्विस्ट

googlenewsNext
ल्या आवडत्या कलाकाराच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी रसिक फार उत्सुक असतात.त्यांच्या जीवनातील प्रत्येक घडामोडींवर रसिकांचं बारीक लक्ष असते.विशेषतः त्यांचं अफेअर आणि लग्न याबाबत जाणून घेण्याची रसिकांना विशेष उत्सुकता असते.त्यांच्या लग्नाची बातमी रसिकांना आनंदितही करते तर काही डायहार्ट रसिकांचा हिरमोडसुद्धा.अशीच एका कलाकाराच्या लग्नाची बातमी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.ही बातमी आहे दक्षिणेची अभिनेत्री राशी खन्नाबाबतची.राशीच्या लग्नाचे फोटो सध्या व्हायरल झालेत.या फोटोमध्ये ती अभिनेता नितीनसोबत पारंपरिक नववधूच्या मेकअपमध्ये मंडपात बसलेली पाहायला मिळतेय.राशीचे लग्न झालं ही गोष्ट काहींसाठी आनंदाची तर काहींच्या काळजाचे तुकडे करणारी.मात्र यांत थोडा ट्विस्ट आहे.कारण राशीचे हे काही खरंखुरं लग्न नाही.हा खरंतर तिच्या आगामी सिनेमातील लग्नाच्या सीनचा फोटो आहे. ती लवकरच 'श्रीनिवास कल्याणम' या सिनेमात झळकणार आहे.या सिनेमातील एका लग्नाच्या सीनसाठी नववधूप्रमाणे ती नटली आहे.अभिनेता नितीनसुद्धा वराप्रमाणे सजला आहे.हे फोटो पाहून कुणालाही विश्वासच बसणार नाही की इथे एखाद्या सिनेमाचा सीन चित्रीत करण्यात आला आहे.हा एक कौटुंबिक पार्श्वभूमी असलेला सिनेमा असून यांत नंदिता श्वेता प्रमुख भूमिकेत आहे.सिनेमाची निर्मिती राजू यांनी केली असून त्यांचा १४ वर्षांनंतर दुसरा सिनेमा आहे.सिनेमाचं दिग्दर्शन वेगेसना सतीश यांनी केले आहे.२३ मार्चपासून सिनेमाचं पुढच्या टप्प्यातलं शूटिंग सुरु होणार आहे.मात्र राशी आणि नितीनच्या लग्नाचा सीन चित्रीत करुन सिनेमाची हवा निर्माण करण्यात निर्मात्यांना आणि कलाकारांना यश आलं आहे.





Web Title: This actress stuck with silk, got married photos, but there is a twist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.