"गेल्या १६ महिन्यांपासून मला..."; अखेर गरोदरपणाच्या चर्चांवर सोनाक्षीने केला खुलासा; म्हणाली- "माझं वजन..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 12:58 IST2025-11-05T12:56:19+5:302025-11-05T12:58:21+5:30
लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच सोनाक्षी सिन्हा गरोदर असल्याची चर्चा सुरु झाली. अखेर या चर्चांवर सोनाक्षीने खुलासा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत

"गेल्या १६ महिन्यांपासून मला..."; अखेर गरोदरपणाच्या चर्चांवर सोनाक्षीने केला खुलासा; म्हणाली- "माझं वजन..."
सोनाक्षी सिन्हा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. सलमान खानसोबत 'दबंग' सिनेमातून सोनाक्षीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 'लुटेरा', 'सन ऑफ सरदार', 'रावडी राठोड' अशा एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमातून सोनाक्षीने काम केलंय. सोनाक्षीने काहीच महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न केलं. सोनाक्षीच्या लग्नाची खूप चर्चा झाली. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत सोनाक्षीने गरोदरपणाच्या चर्चांवर मौन सोडलंय. काय म्हणाली?
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सोनाक्षी गरोदर?
हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंग या दोघांना दिलेल्या पॉडकास्टमध्ये सोनाक्षीने सांगितलं की, ''मी गेल्या १६ महिन्यांपासून गरोदर आहे, असं सांगण्यात येतंय. माझं लग्न झाल्यानंतर बाबांसोबत काही तपासणी करण्यासाठी हॉस्पिटलला गेले होते. तेव्हा मी आणि झहीर त्यांना भेटायला गेलो. आम्ही हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर मीडियाने आमचे फोटो काढले. त्या दिवसापासून मी गरोदर आहे, असं बोललं जातंय. म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच मी गरोदर होते, असं यांचं म्हणणं आहे. मी जेव्हा गरोदर असेल तेव्हा ती गोष्ट लपवून ठेवणार नाही.''
वाढलेलं वजन सोनाक्षीसाठी समस्या
सोनाक्षी सिन्हा याच पॉडकास्टमध्ये पुढे म्हणाली, तिचं वजन लहानपणापासून जास्त आहे. तिच्यासाठी वजन कमी करणं ही कायमच एक समस्या राहिली आहे. १८ वर्षांची असताना ट्रेडमिलवर ३० सेकंद धावणंही तिला जमायचं नाही. परंतु हेल्दी आयुष्य जगण्याचा तिने निर्णय घेतला. दीड वर्ष सोनाली जिममध्ये जाऊन व्यायाम करायची. कार्डियो करायची. तिने विविध गोष्टी केल्या. त्यामुळे तिने थोडंफार वजन कमी केलं.