अभिनेत्रीवर मुंबईत हल्ला, ४० वर्षीय व्यक्तीने भर रस्त्यात केली मारहाण; पोस्ट शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 09:47 IST2025-03-05T09:43:20+5:302025-03-05T09:47:59+5:30

अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत ही भयावह घटना सांगितली आहे.

actress nehal chudasama faced physical assault by a 40 year old known man actress files complaint against him | अभिनेत्रीवर मुंबईत हल्ला, ४० वर्षीय व्यक्तीने भर रस्त्यात केली मारहाण; पोस्ट शेअर करत म्हणाली...

अभिनेत्रीवर मुंबईत हल्ला, ४० वर्षीय व्यक्तीने भर रस्त्यात केली मारहाण; पोस्ट शेअर करत म्हणाली...

अभिनेत्री नेहल चुडासमा (Nehal Chudasama) वर १६ फेब्रुवारी रोजी मुंबईत हल्ला झाला. एका ४० वर्षीय माणसाने तिला मारहाण केली. त्या व्यक्तीला ती २ वर्षांपासून ओळखत होती. नेहलने आता सोशल मीडियावर संपूर्ण भयावह घटना सांगितली. ती यामुळे प्रचंड घाबरली असल्याचं तिने सांगितलं. तसंच च्या व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे. नेहलसोबत नक्की काय झालं?

काय आहे नेहल चुडासमाची पोस्ट?

नेहलने इन्स्टाग्रामवर लिहिले, "मी प्रचंड धक्क्यात आहे. कारण मला हल्ल्याचा क्षण सतत आठवत आहे. पण मी काही दिवसांपूर्वी स्वत:ला यातून सावरलं आहे. कारण मला लढायचं होतं आणि स्वत:साठी उभं राहायचं होतं. एक पीडित महिला असूनही मला तसं जगायचं नाही. एका ४० वर्षीय धष्टपुष्ट व्यक्तीने माझ्या कारचा दरवाजा तोडला. मला शिव्या दिल्या. मी त्याला २ वर्षांपासून ओळखते. माझा डावा हात जोरात पिरगळला गेला. मला अतिशय जोरात गालावर मारण्यात आलं. माझ्या शरिरावर जखमा होत्या त्या अवस्थेत मला सोडण्यात आलं. माझ्या अंगावरुन कार घालेन अशी धमकीही देण्यात आली. माझ्या कारचे पुढचे दरवाजे खराब करण्यात आलं. सार्वजनिक ठिकाणी मला घाणेरड्या भाषेत शिव्या दिल्या. काही महिन्यांपासून माझा पाठलाग केला गेला. टॉर्चर केलं गेलं. मी त्याला कधी शांततेत कधी कठोररित्या थांबवण्याचा प्रयत्न केला तर यामुळे तो जास्तच चवताळला. २ महिलांनी माझी मदत करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही तिघी असूनही त्या माणसाला थांबवू शकलो नाही. हे सगळं मी माझ्यात जी काही थोडी ताकद राहिली आहे आणि मला स्वत:साठी लढायचं आहे म्हणून सांगत आहे."

"मी हे सगळं सहानुभूती मिळवायला सांगत नाहीए पण मी ज्या महिला अशा घटनांचा सामना करतात आणि नंतर शांत बसतात त्यांच्यासाठी मी शेअर करत आहे. हे कोणासोबतही होऊ शकतं. महिला घरात, समाजात सुरक्षित नाहीत."


अभिनेत्रीने त्याच रात्री पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. तिथेही तिला वेगळा अनुभव आला जे ती नंतर सांगेलच असं तिने लिहिलं आहे. त्या माणसावर आधीच फसवणूक आणि गुन्हेगारीचे केसेस होते हे तिला नंतर समजलं. 

नेहल चुडासमाने २०१८ साली मिस युनिव्हर्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. २०२० साली तिने प्रेम राज सोनी यांच्या 'लैला मजनू' सिनेमात काम केलं होतं.

Web Title: actress nehal chudasama faced physical assault by a 40 year old known man actress files complaint against him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.