मृणाल ठाकूरने घेतलं पुण्यातील दगडूशेठ हलवाईचं दर्शन, खास मराठीत पोस्ट करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 16:46 IST2026-03-17T16:38:47+5:302026-03-17T16:46:05+5:30
मृणाल नुकतीच पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेली होती. तिथे गेल्यावर मृणालने मराठीत पोस्ट लिहिली.

मृणाल ठाकूरने घेतलं पुण्यातील दगडूशेठ हलवाईचं दर्शन, खास मराठीत पोस्ट करत म्हणाली...
मृणाल ठाकूर ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री. मृणालला आपण विविध मराठी, हिंदी आणि साऊथच्या सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. मृणालने सीता रामम सारख्या साऊथ सिनेमांत उत्कृष्ट भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मन जिंकलं. मृणाल हिंदी सिनेसृष्टीत सक्रीय असली तरीही ती तिचं मराठीपण विसरली नाहीये. मृणाल नुकतीच पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेली होती. तिथे गेल्यावर मृणालने मराठीत पोस्ट लिहिली.
मृणालची बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मराठीत पोस्ट
मृणालने सोशल मीडियावर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील फोटो शेअर केले आहेत. या मृणाल भक्तीभावाने बाप्पाच्या पाया पडताना दिसतेय. ''पुण्यात आलो आणि बाप्पाचं दर्शन घेतलं नाही तर काय केलं?'', अशी खास पोस्ट मृणालने केली आहे. मृणालने ही छोटीशी पोस्ट करताच चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मृणाल ठाकूरने शूटिंगच्या व्यस्त दिनक्रमातून वेळात वेळ काढून पुण्याला जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. मृणालच्या या मराठमोळ्या अंदाजावर सर्वजण आनंदी झाले.
मृणाल ठाकूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, ती शेवटी 'सन ऑफ सरदार २' या सिनेमात दिसली होती. अजय देवगण, रवी किशनची भूमिका असलेल्या या सिनेमात मृणाल ठाकूरने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना आवडली. मृणाल आता आगामी 'डकैत' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा आधी एप्रिलमध्ये रिलीज होणार होता. परंतु 'धुरंधर २'मुळे मृणालच्या या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. मृणालच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.