तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत केलं ब्रेकअप? चाहत्यांना मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 11:40 IST2025-10-27T11:37:47+5:302025-10-27T11:40:01+5:30
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे

तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत केलं ब्रेकअप? चाहत्यांना मोठा धक्का
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाने (Krystle D'Souza) तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, क्रिस्टल आणि तिचा बॉयफ्रेंड गुलाम गॉस दीवानी यांनी त्यांचं तीन वर्षांचे नातं संपुष्टात आणलं आहे. क्रिस्टल आणि गुलामचं ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. जाणून घ्या
एक महिन्यापूर्वी झालं ब्रेकअप
मीडिया रिपोर्टनुसार, क्रिस्टल आणि गुलाम यांचं ब्रेकअप एक महिन्यापूर्वीच झालं आहे. या दोघांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एकमेकांना 'अनफॉलो' केलं आहे, ज्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे. क्रिस्टल डिसूझा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या घटनांबद्दल बोलणं टाळते. त्यामुळे जेव्हा तिला ब्रेकअपबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिने 'नो कमेंट्स' असं सांगत या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला.
यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत क्रिस्टलने गुलामबद्दल उघडपणे बोलताना सांगितलं होतं की, "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळात गुलाम माझ्यासोबत होता. त्याने मला खूप आधार दिला, मला शक्ती दिली आणि मी जशी आहे तसा स्वीकार केला. जर आज माझ्यामध्ये कॅमेरासमोर आत्मविश्वासाने आणि धैर्याने काम करण्याची ताकद असेल, तर त्यात गुलामचा मोठा वाटा आहे." परंतु आता तिच्या ब्रेकअपच्या चर्चांमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गुलाम गॉस दीवानी हा बिझनेसमन आणि रेस्टॉरंट मालक आहे. ब्रेकअपबद्दल क्रिस्टल आणि गुलाम यांच्यापैकी कोणीही अधिकृत घोषणा केली नाहीये.