धक्कादायक! प्रसिद्धी अभिनेत्रीने वहिनीविरोधात ठोकला २ कोटींच्या मानहानीचा दावा, जाहीर माफीचीही मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 16:00 IST2026-04-09T15:57:45+5:302026-04-09T16:00:16+5:30
दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सध्या एका वैयक्तिक आयुष्यामुळे. अभिनेत्रीने तिची एक्स वहिनी मुस्कान मोटवानी हिच्यावर मानहानीचा खटला दाखल केला असून, २ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईसह सार्वजनिक माफीची मागणी केली आहे

धक्कादायक! प्रसिद्धी अभिनेत्रीने वहिनीविरोधात ठोकला २ कोटींच्या मानहानीचा दावा, जाहीर माफीचीही मागणी
दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानी सध्या एका वैयक्तिक आयुष्यामुळे. हंसिकाने तिची एक्स वहिनी मुस्कान मोटवानी हिच्यावर मानहानीचा खटला दाखल केला असून, २ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईसह सार्वजनिक माफीची मागणी केली आहे. हंसिकाचा भाऊ प्रशांत आणि मुस्कान यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर मुस्कानने सोशल मीडिया माध्यमातून हंसिका व तिच्या कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानजनक विधाने केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे.
हंसिकाच्या मते, मुस्कानने केलेले हे सर्व दावे पूर्णपणे बिनबुडाचे असून त्यामुळे तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या सामाजिक प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. २७ लाखांची उधारी फेडता येऊ नये, म्हणून वहिनीने हे आरोप केल्याचं हंसिकाचं म्हणणं आहे. या कायदेशीर कारवाईच्या माध्यमातून हंसिकाने केवळ आर्थिक भरपाईच मागितलेली नाही, तर मुस्कानने तिची चूक मान्य करून जाहीरपणे माफी मागावी आणि भविष्यात कुटुंबाबद्दल अशी कोणतीही विधाने करू नयेत, याचीही कोर्टात विनंती केली आहे.
हंसिकाचे वकिलांच्या सांगण्याप्रमाणे मुस्कानने ही विधाने केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केली गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वैयक्तिक आयुष्यातील वाद सार्वजनिक ठिकाणी आणून एका सेलिब्रिटीची बदनामी केल्यामुळे हंसिकाने वहिनीविरोधात हे कठोर पाऊल उचलले आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात असून, यावर आता मुस्कान मोटवानी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चाहत्यांनी देखील सोशल मीडियावर हंसिकाच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शविला आहे.
हंसिकाच्या वैयक्तिक आयुष्यातही काही दिवसांपूर्वी वादळ आलं. लग्नाच्या ४ वर्षांतच हंसिकाचा घटस्फोट झाला. हंसिका आणि सोहेल हे गेल्या २ जुलै २०२४ पासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. त्यांच्यात वारंवार होणारे मतभेद आणि जीवनशैलीतील तफावत यामुळे हे नाते पुढे नेणे अशक्य असल्याचे दोन्ही पक्षांनी न्यायालयात मान्य केले.