हेमा मालिनीमुळे मोडला धर्मेंद्रचा पहिला संसार; अरुणा इराणींनी केली ड्रीम गर्लची पाठराखण; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 08:59 AM2024-05-24T08:59:53+5:302024-05-24T09:01:06+5:30

Aruna irani: मालिनीमुळे धर्मेंद्र यांचा सुखासुखी चाललेला संसार उद्धवस्त झाला असं म्हणत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. मात्र, या सगळ्यावर आता अभिनेत्री अरुणा इराणी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

actress-aruna-irani-has-made-a-big-revelation-about-actress-hema-malini-and-dharmendras-marriage | हेमा मालिनीमुळे मोडला धर्मेंद्रचा पहिला संसार; अरुणा इराणींनी केली ड्रीम गर्लची पाठराखण; म्हणाल्या...

हेमा मालिनीमुळे मोडला धर्मेंद्रचा पहिला संसार; अरुणा इराणींनी केली ड्रीम गर्लची पाठराखण; म्हणाल्या...

बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र (dharmendra) यांचे सिनेमा जितके गाजते त्याच्यापेक्षा कैकपटीने त्यांच्या वैवाहिक जीवनाची नेटकऱ्यांमध्ये चर्चा झाली. प्रकाशकौरसोबत संसार थाटलेल्या धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत (hema malini) दुसरं लग्न केलं. परंतु, त्यांच्या या निर्णयामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यात अनेकांनी हेमा मालिनीवर अनेक आरोप केले. हेमा मालिनीमुळे धर्मेंद्र यांचा सुखासुखी चाललेला संसार उद्धवस्त झाला असं म्हणत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. मात्र, या सगळ्यावर आता अभिनेत्री अरुणा इराणी (aruna irani) यांनी ड्रीमगर्लची पाठराखण केली आहे.

अलिकडेच अरुणा इराणी यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नावर भाष्य केलं. सोबतच प्रकाशकौरसोबत जे झालं त्याला हेमा मालिनी जबाबदार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
लग्नाची गॅरंटी नसते.
 

"हेमा मालिनीने धर्मेंद्रसोबत लग्न केलं. पण, त्यांचा पहिला संसार मोडायचा किंवा त्यांना त्यांच्या कुटुंबापासून वेगळं करायचा तिचा कोणताच उद्देश नव्हता. तसा तिने कधी प्रयत्नही केला नाही. लग्नाची काहीच गॅरंटी नसते. गॅरंटी असते ती फक्त आणि फक्त प्रेमाची", असं म्हणत अरुणा इराणी यांनी हेमा मालिनीची पाठराखण केली.

पुढे त्या म्हणतात, "जर तुमचं एकमेकांवर प्रेम असेल तर तुमचं लग्न टिकतं. आपण म्हणू शकतो की ही माझी पत्नी आहे किंवा हा माझा पती आहे. पण, जिथे प्रेम संपतं तिथे लग्न तुटतात."

दरम्यान, अरुणा इराणी यांच्या या विधानाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाशकौरसोबत झालं होतं. त्यांना सनी देओल, बॉबी देओल हे दोन मुलं आणि दोन मुलीदेखील आहेत. त्यानंतर त्यांनी १९८० मध्ये प्रकाशकौरसोबत घटस्फोट न घेता हेमा मालिनीसोबत लग्न केलं. या जोडीला ईशा आणि आहाना या दोन मुली आहेत.

Web Title: actress-aruna-irani-has-made-a-big-revelation-about-actress-hema-malini-and-dharmendras-marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.