वयाच्या ४९ व्या वर्षी लग्न करणार डिनो मोरिया? डेटिंग लाईफचा केला खुलासा; कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 11:27 IST2025-03-13T11:26:59+5:302025-03-13T11:27:45+5:30

डिनो मोरियाच्या आयुष्यात प्रेमासाठी खास जागा, म्हणाला...

actor dino morea talks about dating life and breakup with bipasha basu | वयाच्या ४९ व्या वर्षी लग्न करणार डिनो मोरिया? डेटिंग लाईफचा केला खुलासा; कोण आहे ती?

वयाच्या ४९ व्या वर्षी लग्न करणार डिनो मोरिया? डेटिंग लाईफचा केला खुलासा; कोण आहे ती?

'राज' सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता डिनो मोरिया (Dino Morea) आठवतोय? डिनो इंडस्ट्रीत फारसा यशस्वी होऊ शकला नाही. हँडसम लूक, जबरदस्त फिटनेस असूनही तो सिनेसृष्टीत आपलं स्थान मिळवू शकला नाही. डिनो आणि बिपाशा बसुचं अफेअर एकेकाळी खूप चर्चेत होतं. अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. डिनो ४९ वर्षांचा असून अद्याप अविवाहित आहे. मात्र आता त्याने लग्नावर भाष्य केलं आहे. अभिनेता या वयात लग्न करणार का?

'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत डिनो मोरिया म्हणाला, "प्रेम ही कमालीची गोष्ट आहे. प्रत्येकाने प्रेमात पडायला हवं. तुम्ही पृथ्वीवर प्रेमाचा प्रसार करायलाच आला आहात. भाऊ, बहीण, आई, वडील, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, नवरा, बायको पत्नी आणि अगदी आपल्या पाळीव प्राण्यावरही करा. तुम्ही जितकं प्रेम द्याल तितकंच जास्त तुम्हाला प्रेम मिळेल. प्रत्येकालाच आपल्यावर कोणीतरी प्रेम करावं असं हवं असतं."

डिनोला तो कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, "हो, असू शकतं." लग्नाविषयी तो म्हणाला, "मला वाटतं लग्न हा फक्त एक स्टॅम्प असतो. एक करार ज्यात तुम्ही दोघं सोबत आयुष्य जगता. पण ही लग्नसंस्था समाजानेच बनवली आहे. दोन जणांचं लग्न झालं आणि आता दोघंही पूर्ण आयुष्य सोबत असतील. जर काही अडचणी आल्या तर लग्न तोडण्याचा प्रयत्न करु नका. जर नाहीच झालं तर तोडा."

बिपाशाने नाही तर मीच ब्रेकअपचा निर्णय घेतला

बिपाशा बसुसोबतच्या ब्रेकअपवर डिनो म्हणाला, "तिने नाही मीट ब्रेकअपचा निर्णय घेतला होता. राज सिनेमाच्यावेळी जेव्हा आण्ही वेगळे झालो तेव्हा खरं सांगायचं तर मीच तिच्यापासून दूर झालो. आमच्यात काही मुद्दे होते. मला फार कठीण वाटत होतं. मी रोज तिला सेटवर भेटत होतो. ती निराश होती. जिची मला खूप जास्त काळजी आहे तिला रोज भेटणं फार कठीण होतं. आम्ही सगळं काही ठीक करण्याचा प्रयत्न केला पण ते होऊ शकलं नाही."

Web Title: actor dino morea talks about dating life and breakup with bipasha basu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.