अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 21:39 IST2025-10-20T21:39:13+5:302025-10-20T21:39:50+5:30
Actor Asrani Death : ढोल, धमाल, खट्टा मीठा आणि शोले सारख्या चित्रपटांमधील विनोदी भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते आणि कॉमेडियन असरानी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले आहे.

अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
Asrani Last Insta Post: ढोल, धमाल, खट्टा मीठा आणि शोले सारख्या चित्रपटांमधील विनोदी भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते आणि कॉमेडियन असरानी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले आहे. ते ५ दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते, त्यानंतर आज म्हणजेच २० ऑक्टोबर रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेते असरानी सोशल मीडियावर खूप सक्रीय होते. त्यांनी आज ६ तासांपूर्वी चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणारी एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली होती, जी इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. परंतु या पोस्टच्या आधी ७ दिवसांपूर्वी अभिनेते असरानी यांनी इंस्टाग्रामवर आणखी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्यांनी अभिनेते कादर खान यांच्या आठवणींना उजाळा दिला होता.
इंस्टाग्रामवर अभिनेते असरानी यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात ते कादर खान यांच्यासोबत दिसत आहेत. त्या क्लिपमध्ये कादर खान म्हणतात, "मैं लब ए सिखवा को सी लेता हूं. चंद घड़ियां है यूं ही जी लेता हूं. मगर एक बार समझ लेता हूं जिसे दोस्त का हाथ. फिर उस हाथ से जहर भी पी लेता हूं." या पोस्टसोबत असरानी यांनी कॅप्शनमध्ये हार्ट आणि भावनिक इमोजीसह लिहिले होते, "मिस यू कादर खान साहब."
याव्यतिरिक्त, कमेंट सेक्शनमध्येही अभिनेत्याने लिहिले होते, "जहाँ दुनिया तुमसे बदलने को कहे, वहाँ दोस्त वो है जो तुम्हें तुम्हारे जैसे ही अपनाए." ही पोस्ट चाहत्यांना खूप आवडली होती. दरम्यान, अभिनेत्याच्या अचानक निधनाच्या बातमीमुळे चाहतेही हैराण झाले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.