प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीचा वाढदिवस

By Admin | Updated: August 11, 2016 11:34 IST2016-08-11T11:34:38+5:302016-08-11T11:34:38+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीचा आज (११ ऑगस्ट) वाढदिवस.

Bollywood superstar Sunil Shetty's birthday | प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीचा वाढदिवस

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीचा वाढदिवस

>संजीव वेलणकर 
पुणे, दि. ११ - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीचा आज (११ ऑगस्ट) वाढदिवस. 
सुनिल शेट्टीचे पूर्ण नाव सुनिल लामा शेट्टी असे आहे. परंतु, हिंदी चित्रपटसृष्टीने त्याला अण्णा हे टोपण नाव दिले आहे. सुनिल शेट्टी यांनी १९९२ मध्ये करिअरची सुरवात केली. त्याच्या अदाकारीला प्रेक्षकांची चांगलीच वाहवाह मिळाली आहे. काही चित्रपटांमधील त्याची अदाकारी कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारी आहे. सुनिल शेट्टीची ओळख अॅक्शन हिरो अशी होती. मोहरा, धडकन, खेल, रक्त, भागम भाग, थॅंक्यू, कयामत, बॉर्डर इत्यादी चित्रपटांमधील त्याची भूमिका स्मरणात राहणार्या आहेत. २००१ मध्ये त्यांना धडकन या चित्रपटातील अभिनयासाठी बेस्ट व्हिलनच्या फिल्म फेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सुनिल शेट्टीचे पूर्ण नाव सुनिल लामा शेट्टी असे आहे. परंतु, हिंदी चित्रपटसृष्टीने त्याला अण्णा हे निकनेम दिले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकाराप्रमाणेच त्याने निर्माता म्हणूनही काम केले आहे. अॅक्टिंग करता करता ते आता हॉटेल व्यवसायात पण आहेत.
सुनील शेट्टी यांना लोकमत समूहाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा....
 
 

Web Title: Bollywood superstar Sunil Shetty's birthday