अक्षयला करायचे आहेत बायोपिक

By Admin | Updated: November 25, 2014 00:20 IST2014-11-25T00:20:13+5:302014-11-25T00:20:13+5:30

मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात शाहरुख खान मुख्य निभावणार असल्याची चर्चा आहे.

Biosciks are about to be revealed | अक्षयला करायचे आहेत बायोपिक

अक्षयला करायचे आहेत बायोपिक

सध्या बॉलीवूडमध्ये चरित्रपर (बायोपिक) चित्रपटांचे चलन सुरू आहे. फरहान अख्तर, इरफान आणि प्रियंका चोप्रा यांनी अशा चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आता बॉलीवूडमधील अनेक कलाकारांना एखाद्या महान व्यक्तीची भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहेत. रणवीर सिंहही बाजीराव ‘मस्तानी’मध्ये बाजीराव पेशवे यांची भूमिका निभावतो आहे, तर मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात शाहरुख खान मुख्य निभावणार असल्याची चर्चा आहे. जेव्हा अक्षय कुमारला विचारण्यात आले की, त्याला बायोपिक करायला आवडेल का, तेव्हा त्याने उत्तर दिले, ‘मला अद्याप कोणत्याही बायोपिकची ऑफर आलेली नाही; पण जर मला ऑफर मिळाली, तर मी माङया भूमिकेला नक्कीच न्याय देईन; पण कोणत्या रिअल लाईफ हीरोची भूमिका मी साकारू शकेन हे सांगता येणार नाही.’

 

Web Title: Biosciks are about to be revealed