उपाशी राहून काढले दिवस, निर्मात्यांचे उंबरठे झिजवले; अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी धर्मेंद्र करायचे 'ही' नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 18:12 IST2025-11-24T18:09:40+5:302025-11-24T18:12:30+5:30
३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम अन्...; 'अशी'आहे धर्मेंद्र यांची फिल्मी कारकिर्द

उपाशी राहून काढले दिवस, निर्मात्यांचे उंबरठे झिजवले; अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी धर्मेंद्र करायचे 'ही' नोकरी
Actor Dharmendra Journey:बॉलिवूडमधील ही-मॅन धर्मेंद्र यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवसांपासून त्यांच्यावर राहत्या घरी उपचार सुरू होते, पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.अलिकडच्या काळात त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. शिवाय अनेक बॉलिवूड स्टार त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते. आज त्यांचं निधन झालं आहे. १९६०-८० या दशकात सिल्वर स्क्रीन गाजवणारा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. परंतु, तुम्हाला माहितीये का? अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी धर्मेंद्र काय काम करायचे? जाणून घेऊयात...
धर्मेंद्र यांचा जन्म पंजाबमधील कपूरथला जिल्ह्यात ८ डिसेंबर १९३५ ला झाला. त्यांचं मूळ गाव साहनेवाल. लहानपणापासून त्यांना कुस्तीची आवड होती पण, अभिनयाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ही-मॅन धर्मेंद्र यांनी लुधियानातील सरकारी माध्यमाच्या शाळेत आपलं शिक्षण पूर्ण केलं. आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी रेल्वेत क्लर्क म्हणून कामही केलं होतं. त्यावेळी त्यांचा पगार केवळ सव्वाशे रुपये महिना इतका होता. त्यानंतर १९ व्या वर्षी घरच्यांनी प्रकाश कौर यांच्याशी त्याचं लग्न लावून दिलं. आपल्या लग्नानंतर फिल्मी जगतात करिअर करण्यासाठी ते 'मायानगरी' मुंबईत आले. धर्मेंद्र यांनी चित्रपटसृष्टीत कोणत्याही गॉडफादरशिवाय एक स्थान निर्माण केलं. कित्येक वेळा केवळ चणे खावून बाकावर झोपणे नशीबात आले. भुकेल्या पोटी निर्मात्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवले पण काम मिळालं नाही.
१९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्र यांनी आत्तापर्यंत २५० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. त्यांनी 'शोले', 'आँखें', 'शिकार', 'आया सावन झूम के', 'जीवन मृत्यू', 'मेरा गाव मेरा देश', 'सीता और गीता', 'राजाजानी', 'जुगनू','चरस', 'धरमवीर', 'रेशम की डोर', 'चुपके चुपके', 'दिल्लगी',' द बर्निंग ट्रेन', 'हाथियार' असे एकाहून एक सरस असे चित्रपट इंडस्ट्रीला दिले. इतकंच नाहीतर त्यांनी पंजाबी चित्रपटातही काम केलं. १९७६ ते १९८४ च्या काळात त्यांनी अनेक अॅक्शनपट केले.धर्मेंद्र यांनी फक्त एक्शनच नव्हे, तर कॉमेडी आणि भावनात्मक भूमिका सुद्धा प्रभावीपणे साकारल्या. जवळपास सहा दशकांपर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांवर आपली छाप सोडली.