काय त्या अदा अन् नखरा...लेहेंग्यात राशी खन्ना दिसतेय कमाल, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल Wowwww!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 04:26 PM2024-04-30T16:26:19+5:302024-04-30T16:35:18+5:30

अभिनेत्री राशी खन्ना अप्रतिम सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. आजतागायत अनेक चित्रपटांमधून राशीने आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं.

आपल्या फिल्मी करीअर आणि पर्सनल लाईफमुळे नेहमीच लाईमलाईटमध्ये राहिली. तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठीही ती ओळखली जाते. त्यामुळे तिचे चाहते तिच्या नव्या लुकसाठी उत्सूक असतात.

राशी खन्ना ही सोशल मीडियावर सक्रीय असते. येथे ती विविध लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

नुकतेच तिनं ट्रेडिशनल लूकमधले फोटो शेअर केले आहेत, जे पाहून तिचे चाहते घायाळ झालेत.

यावेळी राशी खन्ना लाल रंगाच्या लेहेंगामध्ये दिसत आहे. तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

लेहेंगा सेटमध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणेच सुंदर दिसतेय. मोकळे केस यामुळे ती नाजूक बाहुलीसारखी दिसतेय.

राशी खन्ना हिनं लेहेंग्यात एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. चाहते तिच्या फोटोवरून नजर हटवू शकत नाही आहेत.

राशी खन्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिचा कोणताही फोटो आणि व्हिडीओ शेअर केला तर तो काही सेकंदात व्हायरल होतो.

राशी खन्नाने केवळ बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही तर जगभरातील चाहत्यांच्या मनावर उत्तम छाप पाडली आहे.

अनेक गाजलेल्या सिनेमा, वेबसीरिजमध्ये झळकलेली राशी लवकरच द साबरमती रिपोर्टमध्ये झळकणार आहे. तसंच ती अरनमानई 4 , तेलुसू काडा या दाक्षिणात्य सिनेमातही झळकणार आहे.