‘लेक माझी लाडकी’च्या सेटवर अपघात

By Admin | Published: February 18, 2017 05:19 AM2017-02-18T05:19:59+5:302017-02-18T05:19:59+5:30

लेक माझी लाडकी या मालिकेत सायली देवधर मीरा ही भूमिका साकारत आहे.

Accident on the set of 'Lake my dear' | ‘लेक माझी लाडकी’च्या सेटवर अपघात

‘लेक माझी लाडकी’च्या सेटवर अपघात

googlenewsNext

लेक माझी लाडकी या मालिकेत सायली देवधर मीरा ही भूमिका साकारत आहे. या मालिकेत मीरा आत्महत्येचा प्रयत्न करणार असल्याचे दाखवण्यात येणार आहे. या दृश्याचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. पण, या चित्रीकरणाच्यावेळी एक अपघात घडला. या अपघातातून सायली थोडक्यात बचावली. मीरा पंख्याला लटकून आत्महत्या करत असल्याचे दृश्य चित्रीत केले जात होते. या दृश्यासाठी सायली गळ्यात फास अडकवून दृश्य चित्रीत करण्यासाठी तयार होती. पण, तेवढ्यात आत्महत्या करण्यासाठी ज्या पंख्याला दोरी बांधण्यात आली होती, तोच पंखा सायलीच्या खांद्यावर पडला. एका क्षणासाठी काय झाले हे कोणालाच कळले नाही. पण इतका मोठा अपघात होऊनही सायलीला काहीही झाले नसल्याने सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, असे समजतेय.

Web Title: Accident on the set of 'Lake my dear'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.