'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 03:06 PM2024-05-10T15:06:04+5:302024-05-10T15:08:00+5:30

अब्दुच्या या गुडन्यूजवर त्याचा जवळचा मित्र अभिनेता शिव ठाकरेने प्रतिक्रिया दिली आहे.

Abdu Rozik getting married but his close friend Shiv Thakre has no idea about it | 'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...

'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...

ताजिकिस्तानी गायक आणि बिग बॉस 16 मधून लोकप्रिय झालेला दुबईचा अब्दु रोझिकने (Abdu Rozik) आज सर्वांनाच सरप्राईज दिलं. अब्दुने लग्न करणार असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. 7 जुलै रोजी तो लग्नबंधनात अडकणार असल्याचं त्याने सांगितलं. मात्र ती मुलगी कोण आहे हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. अब्दुच्या या गुडन्यूजवर त्याचा जवळचा मित्र अभिनेता शिव ठाकरेने प्रतिक्रिया दिली आहे.

अब्दु रोजिकने शेअर केलेली लग्नाची बातमी खरी आहे की कोणता प्रँक असाच प्रश्न चाहत्यांना पडलाय. विशेष म्हणजे शिव ठाकरे जो त्याचा इतका जवळचा मित्र आहे त्यालाही अब्दुच्या लग्नाबाबत काहीच माहिती नाहीये. न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरे म्हणाला, "मला याबद्दल काहीच कल्पना नाही. मुलगी कोण आहे हेही मला माहित नाही. मलाही सोशल मीडियावरुनच समजलं. उलट मी तर अब्दुशी काल रात्रीच अर्धा तास फोनवर बोलत होतो. पण त्याने लग्नाबाबत काहीच उल्लेखही केला नाही. ही बातमी खोटी आहे का हेही मला माहित नाही."

खलीज टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अब्दुचा साखरपुडा झाला आहे. मात्र ते गुलदस्त्यात ठेवलं गेलं. अब्दु दुबईतील शारजाहच्या अमिरा या मुलीशी लग्नबंधनात  अडकणार आहे. अब्दु २० वर्षांचा असून अमिरा १९ वर्षांची आहे. फेब्रुवारी महिन्यात दुबईतील एका मॉलमध्येच दोघांची भेट झाली. 

अब्दु रोजिकचे बिग बॉसमुळे भारतातही मोठे चाहते आहेत. तो सलमान खानच्या अगदी जवळचा आहे. सलमानने त्याला 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातही घेतलं होतं. 

Web Title: Abdu Rozik getting married but his close friend Shiv Thakre has no idea about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.