'वस्त्रहरण' नाटकाची ४४ वर्ष पूर्ण; लवकरच पार पडणार ५२५५ वा प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 17:08 IST2024-02-16T17:07:57+5:302024-02-16T17:08:59+5:30
Vastra haran: मच्छिंद्र कांबळी यांनी १६ फेब्रुवारी १९८० रोजी हे नाटक रंगमंचावर सादर केलं.

'वस्त्रहरण' नाटकाची ४४ वर्ष पूर्ण; लवकरच पार पडणार ५२५५ वा प्रयोग
नाटक म्हणजे मराठी प्रेक्षक वर्गाचा जिव्हाळ्याचा विषय. अनेक कलाकार रंगमंचावर प्राण ओतून अभिनय सादर करत असतात. आजवर मराठी कलाविश्वात अनेक दर्जेदार नाटकांची निर्मिती करण्यात आली. त्यातलंच एक गाजलेलं नाटक म्हणजे वस्त्रहरण. मालवणी भाषेत उत्तम सादरीकरण करण्यात आलेल्या या नाटकाने प्रेक्षकांच्या मनावर जवळपास ४० वर्षापेक्षा जास्त काळ राज्य केलं आहे. त्यामुळे आजही या नाटकाची लोकप्रियता तसूभरी कमी झालेली नाही. त्यामुळेच हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झालं आहे.
कोकणात जन्मलेल्या एका मराठी मालवणी भाषिक माणसाने मालवणी बोलीभाषेतून “वस्त्रहरण” हे नवंकोर नाटक रंगभूमीवर आणून रंगमंच आणि रसिकांसाठी मनोरंजनाचे आगळेवेगळे नवे दालन उघडं केलं. १६ फेब्रुवारी १९८० मध्ये मच्छिंद्र कांबळी यांनी वस्त्रहरण या नाटकाचा पहिला यशस्वी प्रयोग केला. विशेष म्हणजे व्यावसायिक मराठी रंगभूमीवर या नाटकाने इतिहास घडवला. आज या नाटकाला तब्बल ४४ वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना या नाटकाचे मोजके ४४ प्रयोग अनुभवता येणार आहेत.
दरम्यान, भद्रकाली प्रोडक्शन्स सेलिब्रेटी कलाकारांच्या संचात रंगमंचावर या नाटकाचे रंगमंचावर मोजके ४४ प्रयोग सादर करण्यात येणार असून या नाटकाचा पार पडणारा हा ५ हजार २५५ वा प्रयोग असणार आहे.