जगात भुतं आहेत - मेलिसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 20:44 IST
हॉलीवुड अभिनेत्री मेलिसा मॅक्कार्थीचे म्हणणे आहे की, तिचा भुतांवर विश्वास आहे.
जगात भुतं आहेत - मेलिसा
हॉलीवुड अभिनेत्री मेलिसा मॅक्कार्थीचे म्हणणे आहे की, तिचा भुतांवर विश्वास आहे. फीमेल फर्स्टनुसार क्रिस्टीन विग आणि केट मॅकिन्नोनसोबत ‘घोस्टबस्टर्स’ या महिलांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटात काम केलेल्या मेलिसाने सांगितले की, मी माझ्या दैनंदिन जीवनात काही अद्भूत असे बदल होत असल्याचे अनुभवत आहे. त्यामुळे मला असे वाटते की, भुतांचे अस्तित्त्व असायला हवे. मला नाही माहित की ते कोणत्या स्वरूपात असतात. मात्र जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझी आत्मा भटकणार आहे. तसेच मेलिसा असाही दावा केला की, ती तिच्या मृत आजी-आजोबांसोबत दररोज गप्पा मारत असते.