शहरं
Join us  
Trending Stories
1
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
2
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
3
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
4
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
5
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
6
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
7
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
8
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
9
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
10
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
11
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
12
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
13
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
14
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
15
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
16
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
17
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
18
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
20
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला

गुगलवर सनी लिओनी 'हीट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:21 IST

लोकप्रिय सर्च इंजिन 'गुगल'ने २0१५ मध्ये सर्वाधिक शोधली गेलेली माहिती जाहीर केली आहे. त्यामध्ये भारत...

लोकप्रिय सर्च इंजिन 'गुगल'ने २0१५ मध्ये सर्वाधिक शोधली गेलेली माहिती जाहीर केली आहे. त्यामध्ये भारतामध्ये सर्वाधिक शोधलेल्या व्यक्तींमध्ये सनी लिओनीने सर्वांत वरचे स्थान पटकावले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहावे स्थान मिळाले आहे. भारतात सर्वाधिक शोधलेल्या पहिल्या दहा व्यक्तींमध्ये लिओनीनंतर सलमान खान, एपीजे अब्दुल कलाम, कॅटरिना कैफ, दीपिका पदुकोन, यो यो हनी सिंग, काजल अग्रवाल, आलिया भट्ट यांचा क्रमांक आहे. समाधानाची बाब ही की देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी सेलिब्रिटींनी खचाखच भरलेल्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. तर मोदींना 'टॉप १0'च्या यादीत सर्वांत शेवटचे स्थान मिळाले आहे.मोदींना २0१४ मध्ये दुसरा क्रमांक मिळाला होता, तर लिओनी पहिल्याच क्रमांकावर होती. सलमानने आता दुसरे स्थान पटकावले आहे. हिट अँड रन प्रकरणामुळे सलमानविषयी देखील अनेकवेळा गुगलवर माहिती सर्च करण्यात आली आहे. बजरंगी भाईजान, प्रेम रतन धन पायो रे, दबंग अशा चित्रपटांमुळेही सलमानला वरचे स्थान मिळाले आहे. सनी लिओनीने मात्र या वर्षीही आपले स्थान कायम ठेवले आहे. यंदा एक पहेली लीलामधून सनीने आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली होती. तसेच तिच्याविरोधात एका गृहिणीने तक्रार केली होती. तसेच कंडोमची जाहिरात केल्यानेही ती चर्चेत आली होती. त्यामुळे इंटरनेटवर सनीला अनेकांनी अनेकवेळा सर्च केल्याचे गुगलने म्हटले आहे. याशिवाय अन्य गटातील सर्वाधिक सर्च झालेल्या विषयांची यादीही 'गुगल'ने जाहीर केली आहे.