व्हॉट्स अॅपवर असे पाठवा ‘ब्लॅँक मॅसेज’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 16:25 IST
व्हॉट्स अॅपने जणू सर्वांनाच वेड लावलंय. आज प्रत्येकजण व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. व्हॉट्स अॅप नेहमी आपल्या यूजर्सना अपडेट ठेवण्यासाठी वेगवेगळे व्हर्जन मार्केटमध्ये आणत असते.
व्हॉट्स अॅपवर असे पाठवा ‘ब्लॅँक मॅसेज’!
व्हॉट्स अॅपने जणू सर्वांनाच वेड लावलंय. आज प्रत्येकजण व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. व्हॉट्स अॅप नेहमी आपल्या यूजर्सना अपडेट ठेवण्यासाठी वेगवेगळे व्हर्जन मार्केटमध्ये आणत असते. नुकतेच त्यात व्हिडिओ चॅटचे आॅप्शनदेखील आले, ज्यामुळे ते अधिकच कम्फर्टेबल अॅप म्हणून प्रचलित झाले. व्हॉट्स अॅपद्वारे आपण कोणाला मॅसेज, फोटो किंवा व्हिडिओ पाठवू शकतो. मात्र आपणास माहित आहे का, की याद्वारे आपण कोणाला ब्लॅँक मॅसेज पाठवू शकतो. नाही ना, चला तर मग आपण ब्लॅँक मॅसेज कसा पाठवायचा याबाबत काही स्टेप्स पाहूया. * सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरमधून ‘नो वर्ड अॅप’ डाउनलोड करा.* आता ‘एपीके’ ला इन्स्टॉल करा आणि फोल्डरला डाऊनलोड करावे, त्यानंतर सेटिंगमध्ये जाऊन सिक्युरिटीतील ‘अननोन सोर्स’ला इनेबल करा. * त्यानंतर ‘नो वर्ड अॅप’ला ओपन करा. ओपन केल्यानंतर आपणास अॅपच्या होम पेजवरील सेंड बटन दिसेल.* आता आपल्याला ज्या अॅपमधून ब्लॅँक मॅसेज पाठवायचा असेल त्याची निवड करा. येथे आपणास व्हॉट्स अॅपला सिलेक्ट करावे लागेल. यानंतर ज्याला मॅसेज पाठवायचा असेल त्याचे चॅट बॉक्स ओपन करा. * आपल्याद्वारे कॉन्टॅक्ट सिलेक्ट केल्यानंतर लगेचच ब्लॅँक मेसेज त्यांना सेंड होईल. याप्रकारे आपण कोणालाही ब्लॅँक मेसेज पाठवू शकता.