रिकी केज-बिग बी एकत्र येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 03:51 IST
ग्रॅमी पुरस्कार विजेता रिकी केज याने बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन ...
रिकी केज-बिग बी एकत्र येणार
ग्रॅमी पुरस्कार विजेता रिकी केज याने बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या एका कार्यक्रमानिमित्त एकत्र येत आहेत. केज याने फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''अमिताभसोबत नुकतेच चित्रीकरण करण्यात आले आहे.माझ्यासाठी हा मोठा सन्मान असून माझे एक स्वप्न पूर्ण झाले आहे.'' केज याला याचवर्षी महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांच्या प्रेम आणि शांतता या मूल्यांवर आधारित 'विंडस् ऑफ समसारा'या अल्बमसाठी ग्रॅमी अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. हा सन्मान प्राप्त करणारा केज ही सर्वांत तरुण भारतीय व्यक्ती आहे. पुरस्कार स्वीकारताना संस्कृत श्लोक म्हणणाराही तो पहिलाच व्यक्ती ठरलाय.