आता व्हॉट्स अॅपच्या स्टेटसमध्ये करा इमेज वा व्हिडीओचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 17:27 IST
आपल्या यूजर्सला नेहमी अद्ययावत ठेवण्यासाठी व्हॉट्स अॅप प्रयत्नशील असून, नुकतेच आपल्या यूजर्ससाठी इमेज अथवा व्हिडीओच्या स्वरूपात ‘स्टेटस’ अपडेट करण्याची सुविधा देण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे याला शेअरदेखील करता येणार आहे.
आता व्हॉट्स अॅपच्या स्टेटसमध्ये करा इमेज वा व्हिडीओचा वापर
आपल्या यूजर्सला नेहमी अद्ययावत ठेवण्यासाठी व्हॉट्स अॅप प्रयत्नशील असून, नुकतेच आपल्या यूजर्ससाठी इमेज अथवा व्हिडीओच्या स्वरूपात ‘स्टेटस’ अपडेट करण्याची सुविधा देण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे याला शेअरदेखील करता येणार आहे.सध्या आपण व्हॉट्स अॅपच्या ‘स्टेटस’ मध्ये शब्द आणि इमोजींचा वापर करुन एखादा सुविचार, कविता, गाण्याच्या ओळी अथवा कोणतेही स्वगत टाकतो. मात्र लवकरच स्टेटसमध्ये इमेज अथवा व्हिडीओ अपलोड करता येणार आहे. यासाठी सध्या असणाºया ‘स्टेटस’ च्या जागेच्या बाजूलाच स्वतंत्र ‘टॅब’प्रदान करण्यात येईल. येथे कुणीही आपला वा अन्य गोष्टीचा फोटो वा व्हिडीओ अपलोड करू शकेल. विशेष बाब म्हणजे संबंधित यूजर हे नवीन ‘स्टेटस’ आपल्या मित्रांसोबत शेअर करू शकेल. याशिवाय कुणीही आपल्या स्मार्टफोनच्या कॅमेºयातूनही फोटो वा व्हिडीओ काढून तो अपलोड करू शकतो. अशा प्रकारचे ‘स्टेटस’ हे २४ तासांपर्यंत अॅक्टिव्हेट राहणार आहे. व्हॉट्स अॅपच्या मुख्य स्टेटसबारमधील चॅट आणि कॉलमध्ये ‘स्टेटस’चे स्थान असणार आहे. अर्थात येथून कॉन्टॅक्ट या टॅबला हलविण्यात येईल. सध्या स्नॅपचॅट या अॅपवर अशा पध्दतीने स्टेटस अपडेटची सुविधा आहे. आता व्हॉट्स अॅप याची कॉपी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हॉट्स अॅपने निवडक यूजर्सच्या माध्यमातून याची चाचणी सुरू केली असून, लवकरच हे फिचर सर्व यूजर्सला मिळण्याची शक्यता आहे.