नवीन कारचा 'रनिंग इन'चा काळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:42 IST
जवळजवळ सर्वच कार निर्मात्या कंपन्यांनी असा सल्ला दिला आहे की, नवीन गाडी घेतल्यावर तिच्या इंजिनाच्या गतीला सहजपणे घ्या.
नवीन कारचा 'रनिंग इन'चा काळ
जवळजवळ सर्वच कार निर्मात्या कंपन्यांनी असा सल्ला दिला आहे की, नवीन गाडी घेतल्यावर तिच्या इंजिनाच्या गतीला सहजपणे घ्या. हा सल्ला देण्यामागचे कारण म्हणजे गाडीच्या रनिग इन काळाबाबत लोकांची असलेली चिंता होय. इतर यंत्राप्रमाणेच कारमध्ये सुद्धा काही हलते भाग असतात. ज्यांना व्यवस्थित आणि नियमित काम करण्यास योग्य होण्यासाठी सुरुवातीचा काही काळ जावू द्यावा लागतो. उदाहरणार्थ गाडीची पिस्टन रिंग, बिअरिंग आणि सिलेंडर या भागांना नियमित आणि व्यवस्थितपणे काम सुरू करण्यासाठी हे फार गरजेचे असते. त्याचप्रमाणे टायर, ट्रान्समिशन आणि ब्रेक यांनासुद्धा अशा काळातून जावेच लागते. रनिंग इन काळाची सुरुवात करताना तुम्हाला तुमची गाडी एका निश्चित वेगात ठेवावी लागते. त्याविषयीची माहिती तुमच्या गाडीच्या माहिती पत्रकात दिलेली असते. पेट्रोल इंजिन कारसाठी उत्पादक सहसा गाडीचा वेग २५ हजार ते २७ हजार आरपीएम या र्मयादेत ठेवायला सांगतात. शिवाय ते गाडीचा वेग पहिल्या हजार ते बाराशे किलोमीटर ताशी ८0 किलोमीटरच्या पलीकडे जावू न देण्याचा सल्लाही देतात. एकदा तुम्ही बाराशे किलोमीटरच्या पलीकडे गेला की मग तुम्ही हा वेग तीन हजार ते तीन हजार दोनशे आरपीएम ठेवू शकता, म्हणजेच ताशी शंभर ते ११0 किलोमीटर ठेवू शकता. डिझेल इंजिन असलेल्या गाड्याच्या बाबतीत रनिंग इनच्या काळातला वेग एक हजार किलोमीटरपेक्षा कमी अंतरासाठी हा वेग दोन हजार आरपीएम ऐवढा ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही हा वेग पुढच्या पाचशे ते सातशे किलोमीटरसाठी २८00 आरपीएम ठेवू शकता. तुमच्या वेगावर तुम्ही सातत्याने लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा. हा वेग पहिल्या हजार किलोमीटरसाठी ताशी शंभर किलोमीटरच्या पलीकडे जावू देवू नका.रनिंग इनच्या काळात या गोष्टी टाळागरज नसताना गाडी रिव्हर्स घेऊ नका इंजिनवर जास्त ताण येवू देवू नका. उदाहरणार्थ लवकर वरचा गिअर टाकू नका. जास्तचे असॅलेशन आणि जोर लावून ब्रेक दाबू नका. गाडीवर कारण नसताना वजन वाढवू नका.