शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राशीनुसार बदलतात मेकअपच्या सवयी. तुमच्या सवयी कोणत्या राशीशी जुळतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 20:16 IST

प्रत्येक रास आणि त्या राशीच्या व्यक्तिची मेकअपची अशी एक खास स्टाईल असते. बघा तुमची रास आणि तुमची मेकअप स्टाईल जुळते की नाही . जर तुम्ही या राशीप्रमाणे दिलेल्या सौंदर्याच्या टीप्स करत नसाल तर करून पहायलाही हरकत नाही, तुम्हाला त्या नक्की आवडतील.

ठळक मुद्दे* सिंह राशीच्या महिलांना फारसा मेकअप करायला आवडत नाही. त्या फक्त त्यांच्या केसांबद्दल फारच जागरूक असतात.* वृश्चिक राशीच्या महिलांना लिपस्टिक लावल्याशिवाय मेकअप केल्यासारखा वाटत नाही.* मीन राशीच्या महिलांना लक्झिरिअस मेकअप करायला आवडतो.

- मोहिनी घारपुरे - देशमुखतसं म्हणाल तर राशी वगैरे हा आपला सर्वांचाच उत्सुकतेचा विषय असतो. आपल्या राशीचे मूलभूत गुण, दोष, आवड नावड, मित्र राशी शत्रू राशी यांचाही आपण सतत लक्ष ठेऊन अभ्यास करत असतो आणि तेही आपल्याही नकळत. अगदी तस्सच या बारा राशींच्या सौंदर्याबद्दलच्या गुपितांचंही आहे. प्रत्येक रास आणि त्या राशीच्या व्यक्तिची मेकअपची अशी एक खास स्टाईल असते.बघा तुमची रास आणि तुमची मेकअप स्टाईल जुळते की नाही . जर तुम्ही या राशीप्रमाणे दिलेल्या सौंदर्याच्या टीप्स करत नसाल तर करून पहायलाही हरकत नाही, तुम्हाला त्या नक्की आवडतील.मेष 

या महिलांना गालावरची हाडं एकदम उठावदार असल्यानं त्यांनी मेकअप करताना त्यावर अधिक लक्ष पुरवावे, म्हणजे त्यांचा चेहरा अधिक उठावदार दिसेल.वृषभएखाद्या बाळाला जसं कायम स्वच्छ, फ्रेश ठेवतो अगदी तसंच या राशीच्या महिलाही कायम फ्रेश दिसतात. त्यासाठी विशेषत: साबणाचा फेस करून सतत चेहरा धुण्याचा आनंदही त्या लुटतात. सतत चेहरा धुण्यासारखा आनंद आणि आरशात स्वत:चा तजेलदार चेहरा न्याहाळणं हेच यांचं ब्यूटी स्टेटमेंट असतं.मिथूनआपल्या सुंदरतेशी निगडीत एखादी छोटीशीच गोष्ट त्या नेहमी आवर्जून करतील. आणि विशेष म्हणजे तेवढी लहानशी गोष्टही त्यांचे सौंदर्य अत्यंत मादक करतं. अगदी रोज काजळ लावण्यासारखी क्षुल्लक गोष्ट किंवा केसात गजरा किंवा फूल माळण्याचा आवर्जून केलेला खटाटोप म्हणा ना हवंतर . पण तेवढंही त्यांना सुंदर दिसण्यासाठी पुरून उरतं. 

 

कर्क

या राशीच्या महिला रोज भारंभार मेकअप करत नाही. तरीही त्यांना एखाद्या परीकथेत वर्णन केल्याप्रमाणे आपण दिसावं असं वाटतं हे नक्की, त्यासाठी त्या एखादी एलिगंट गोष्ट आवर्जून करतात. जसं एखादा महागडा परफ्युम, उंची अनमोल नाजूकसे कानातले किंवा अन्य कोणतीही एलिगन्ट ब्यूटी स्टाईल त्या नेहमी हमखास करताना दिसतात.

सिंह

या राशीच्या महिलांना फार सतत सुंदर दिसण्यासाठी मेकअप वगैरे करण्याची गरज वाटत नाही, किंवा अनेकदा या महिला आपल्या आळशीपणामुळे फार टकाटक रहाताना दिसत नाहीत. पण असे असले तरीही या महिला जात्याच सुंदर असतात, विशेषत: त्यांचे केस, डोळे, धारदार नाक यामुळे त्या चारचौघीत लक्ष वेधून घेतात. पण असं असलं तरीही आपल्या केसांच्या सौंदर्याप्रती त्या कायम जागरूक असतात.. वरवर दाखवत नसल्या तरीही!कन्या

स्क्रबिंग करणं आणि त्वचा सतत नितळ राहील यासाठी विशेष प्रयत्न करणं हे या राशीच्या महिलांना आवडतं. त्यासाठी त्या सतत त्वचेवर लिंबाची साल चोळ, कलिंगडाची साल चोळ असले प्रकार करत असतात. विशेषत: आपला चेहरा आणि हात यांच्या कांतीसाठी त्या जागरूक असतात. या महिलांना बाकी फारशी मेकअप वगैरेची आवड नसते. 

तूळया महिलांचा पाऊट एकदम क्यूट असल्यानं त्या नेहमी आपल्या ओठांच्या सौंदर्याकडे अधिक लक्ष देत असतात. लिपलायनरनी ओठांच्या कडा रंगवतील, वेगवेगळ्या लिपस्टीक्स लावतील, त्यावर आवर्जून ग्लॉस लावतील असा सगळा खटाटोप उत्साहानं या बायका करतात पण तसं करत असताना फार कोणाला दिसू नये यासाठीही त्या काळजी घेतात. शेवटी तोरा मिरवायचा तर झाकली मूठ तर ठेवायलाच हवी ना .वृश्चिकविस्कटलेले केस असोत वा कपडेही साधेसुधे असोत पण ओठांवर लाल किंवा तत्सम डार्क रंगाची लिपस्टीक लावली नाही तर या राशीच्या महिलांना आपला मेकअप पूर्ण झाला आहे असं वाटतंच नाही. अगदी दूध आणायला जायचं असलं तरीही सगळ्यात आधी ओठांवर लिपस्टीक लावून मगच त्या घराबाहेर पडतात.धनू

मेकअप करण्याची प्रचंड आवड पण मेकअप काढून टाकण्याची प्रक्रीया मात्र फार कंटाळवाणी वाटणं असं काहीसं या राशीच्या महिलांचं असतं. पण कितीही कटकटीचं वाटलं तरीही त्या हा सगळा खटाटोप करून मगच झोपतील आणि पुन्हा दुसर्या  दिवशी चेहर्याचे लाड करायला, त्यावर रंगरंगोटी करायला सज्ज होतात.

 

 

मकर

खूप सारे हाय क्वालिटीचे क्रीम्स, लोशन्स या राशीच्या महिलांच्या ड्रेसिंग टेबलमध्ये सापडतील. आपल्या त्वचेला सतत कुरवाळत रहाणे, तिचे लाड करत रहाणे आणि त्यासाठी खूप वेगवेगळे प्रॉडक्ट्स वापरणं हीच या राशीच्या स्त्रियांची आवड. त्यामुळेच या राशीच्या स्रिया नेहमी तजेलदार दिसतात. विशेषत: त्यांची त्वचा नेहमी चमकदार दिसते.कुंभ

एखाद्या स्पेशल डेटला जाताना कानामागे एखादं उंची अत्तर आवर्जून चोळणार्या  स्त्रिया म्हणजे कुंभ राशीच्या असं म्हणायला हरकत नाही. इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा यांचा छंद त्यामुळे किमान सौंदर्याच्या बाबतीत तरी त्या काहीतरी हटके करण्याचा सतत प्रयत्न करत असतात. एखादा मादक परफ्युमही त्यांचं सौंदर्य खुलवू शकतो आणि त्यांना इतरांपेक्षा वेगळं दाखवू शकतो.मीनसतत चेहरा पाण्यानं धूणं या राशीच्या स्त्रियांना आवडतं. किंवा आपले हात, पाय सतत पाण्याच्या संपर्कात ठेवणं हेच या महिलांचं सौंदर्य गुपित. त्यामुळे मेनिक्युअर, पेडीक्युअर आणि चेहर्यावर स्प्रेच्या सहाय्यानं पाण्याचे फवारे मारून या स्त्रिया स्वत:ला खूश करत असतात. एरवीही यांच्याकडे भरपूर मेकअपचं साहित्य असतं. आणि त्या त्याचा यथेच्छ वापरही करत असतात. लक्झरीअस रहाणं या महिलांना मुळातच आवडतं.