आयुष्य फारच अनिश्चित.................
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 02:33 IST
प्रसिद्ध कॉमेडियन आणि अँक्टर रॉबिन विल्यम्सच्या आत्महत्येनंतर....................
आयुष्य फारच अनिश्चित.................
प्रसिद्ध कॉमेडियन आणि अँक्टर रॉबिन विल्यम्सच्या आत्महत्येनंतर तब्बल एका वर्षाने त्याची विधवा पत्नी सुझैनने पहिली मुलाखत दिली आहे. 'गुड मॉर्निंग अमेरिका' या शोला दिलेल्या या मुलाखतीमध्ये तिने रॉबिनच्या अनेक आठवणींना अश्रुमय उजाळा दिला. 'रॉबिन खरंच खूप प्रेमळ व्यक्ती होता. तो या जगात नाही, माझ्यासोबत नाही ही भावनाच मला सहन होत नाही. आमचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. आयुष्य फारच अनिश्चित आहे, असे ती म्हणाली. गेल्यावर्षी ११ ऑगस्ट रोजी रॉबिनने आत्महत्या केली होती. त्यावेळी सर्वांनाच प्रचंड धक्का बसला होता. शोची होस्ट एमी रोबॅशने जेव्हा सुझैनला आत्महत्या करण्यापूर्वी रॉबिन कसा होता असे विचारताच तिला डोळ्यातून वाहणारे पाणी थांबवता आले नाही. भरून आलेल्या आवाजात ती म्हणाली, 'त्याचा मृतदेह पाहून मी जोरजोराने रडत होते. माझ्या डोळ्यावर मला विश्वासच बसत नव्हता. रॉबिन तू असे का केले असे मी त्याला विचारत होते.' या दोघांच्या कधीही न पाहिलेल्या व्हिडियो क्लिप्ससुद्धा यावेळी दाखवण्यात आल्या. यामध्ये लग्नाच्या वेळी दोघे