जन्माचा आनंद द्विगुणीत करणारा ‘लीप डे’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 05:45 IST
एखाद्या व्यक्तीचा २९ फेब्रुवारीला आला तर त्याची पंचाईतच व्हायची.
जन्माचा आनंद द्विगुणीत करणारा ‘लीप डे’
29 फ्रे बुवारीला जन्मलेल्या प्रसिद्ध व्यक्तीवर्षातील फेब्रुवारी महिना सोडला तर इतर सर्व महिने 30 किंवा 31 दिवसांचे असतात. मग फक्त फ्रेबुवारी महिना फक्त 28 दिवसांचाच का? त्यातही लीप ईअर आले की फ्रेबुवारीचा आणखी एक दिवस वाढतो व हा महिना 29 दिवसांचा होतो. तीन वर्ष तो 28 दिवसांचा असतो, तर चौथ्या वर्षी या महिन्यात 29 दिवस असतात. ग्रेगरियन कॅलेंडरनुसार फेब्रुवारी महिन्यात 29 तारीख येते तेव्हा ते लीप वर्ष असते असे मानले जाते. पण दर चार वर्षांनी या प्रकारे लीप वर्ष का येते आणि ज्या वर्षात 29 फेब्रुवारी तारीख येते, त्याला लीप वर्ष का म्हणतात? या दोन्ही गोष्टी जाणून घ्यायच्या तर एकूण कलागणनेविषयीच सविस्तर माहिती जाणून घ्यावी लागेल. पृथ्वीची सूर्याभोवतालची प्रदक्षिणा आणि ऋतूंचे आवर्तनचक्र एक असून, ते साधारण 365 दिवस 6 तासांचे आहे, असे गृहित धरून ज्युलियस सिझरने इसवी सन पूर्व 45 मध्ये सौर दिनदर्शिकेत सुधारणा केली. त्यानुसार प्रत्येक चौथे वर्ष 366 दिवसांचे असावे असा नियम केला. ज्या वर्षसंख्येला चारने भागता येईल तेच प्रवर्धित वर्ष म्हणजेच लीप वर्ष घ्यावे असे ठरले.मात्र यातही एक अडचण निर्माण झाली यात ग्रॅगेरिअन यांनी सुधारणा घडवून आणली. नव्या सुधारणेनुसार ज्या वर्षाला 400 ने भाग जाईल तेच वर्ष लीप वर्ष मानले जाते. त्यामुळे 400 वर्षाच्या काळात जे तीन दिवस जास्त होतात, ते काढून टाकण्याची सोय झाली. हा बदल 1582 साली करण्यात आला. तेव्हापासून इंग्रजी दिनदर्शिकेला ग्रेगरियन कॅलेंडर या नावाने ओळखले जाते.मात्र एखाद्या व्यक्तीचा २९ फेब्रुवारीला आला तर त्याची पंचाईतच व्हायची. कारण त्याला आपला वाढदिवस दर चार वर्षांनी साजरा करावा लागणार. लीप डे ला वाढदिवस असणारे हा दिवस किती आनंदाने साजरा करीत असतील. 29 फ्रेबुवारीला जन्मलेल्या काही प्रसिद्ध व्यक्तींची माहिती सीएनएक्सच्या वाचकांसाठी... मोरारजी देसाई भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1896 रोजी झाला. भारताच्या स्वतंत्रा आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविल्यावर त्यांनी स्वतंत्र भारताच्या कॉंग्रेसच्या सरकारमध्ये अनेक पदे भुषविली. इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीनंतर नवनियुक्त गैरकॉंगेसी जनता दलाच्या सरकारचे ते पहिले पंतप्रधान होते. वयाची 100 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी 1995 साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी आपल्या आयुष्यात केवळ 25 वाढदिवस साजरे केले. रूख्मिणी देवी अरुंदळेभरतनाट्यम नर्तिका रूख्मिणी देवी यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1904 साली झाला. त्यांनी भारतीय नृत्यकलेचा विस्तार करण्यात मोलाची भूमिका बजावली. ‘देवदासी’ नृत्यांगणांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न प्रसंशनीय आहेत. भरतनाट्यमला सर्वसामान्यपर्यंत पोहचविण्याचे श्रेय रूख्मिणी देवी यांना दिले जाते. भारताला घडविणा-या 100 लोकांत त्यांचा समावेश करण्यात येतो. 24 फे ब्रुवारी 1986 साली त्याचा मृत्यू झाला. अॅडम सिनक्लेर भारतीय हॉकी संघाचा माजी खेळाडू अॅडम सीनक्लेर याचा जन्म 29 फे ब्रुवारी 1984 साली झाला. 2004 साली झालेल्या अथेन्स आॅलिंपिकमध्ये सहभागी भारतीय संघाचा तो सदस्य होता. ोंटर फॉरवर्ड खेळणा-या अॅडमने भारतीय संघाव्यतिरिक्त देशाअंतर्गत इंडियन ओव्हरसिज बँकेसह विविध संघाचा अॅडम सदस्य होता. केवळ हॉकी खेळाडू म्हणून त्याने प्रसिद्धी मिळविली नाही तर ट्रिपल जंप, हाय जंप व मॅराथॉन स्पर्धेत त्याने पदके मिळविली. हॉकीमधील सेंटर फ ॉरबर्ड खेळाडूत त्याचा समावेश होतो. जेसिका लाँग रशियान मुळाची अमेरिक न पॅराआॅलिम्पिक जलतरणपटू जेसिका लाँग हिचा जन्म 29 फेब्रुवारी 1992 साली झाला. तिने पॅराआॅलिम्पिक स्पर्धेत अनेक जागतिक विक्रम नोंदविले. तीन उन्हाळी पॅराआलिम्पिक स्पर्धेत अनेक पदकांची ती मानकरी ठरली. जलतरणपटू म्हणून 2006 साल गाजविले, या वर्षांत तिने तब्बल 16 जागतिक विक्रमांची नोंद केली. अपंगाच्या विश्व जलतरण स्पर्धेत तिने 9 सुवर्णपदकांची कमाई केली. 2006 साली तिला वर्षातील सर्वोत्कृष्ठ जलतरणपटूचा मान मिळाला. अँटिनो सबातो ज्यू.जागतील सर्वांत चांगल्या निवेदकांत सामविष्ठ असलेला अमेरिकन रिअॅलिटी टीव्ही स्टार व मॉडेल अँटिनो सबातो याचा जन्म 29 फेब्रुवारी 1972 साली इटलीत झाला. प्रसिद्ध लाईफस्टाईल ब्रॅण्ड केल्व्हिन क्लेनच्या जाहिरातीमध्ये झळकल्यावर त्याची फॅशन जगताने त्याला उचलून धरले. मॉडेलिंगसह टीव्ही व चित्रपटातील त्याच्या भूमिका गाजत असताना त्याने रिअॅलिटी शोच्या निवेदनाची जबाबदारी पार पाडली. त्याच्या निवेदनामुळे रिअॅलिटी शो हिट झाल्याचे सांगण्यात येते. अमेरिक टीव्ही इंडस्ट्रिचा मोठा स्टार म्हणून अँटीनोची ओळख आहे.