शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

मुलींसाठी अनारकली तर मुलांसाठी मनारकली. पुरूषांच्या फॅशन विश्वात इण्डो वेस्टर्न स्टाइलचा धमाका.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 19:37 IST

फॅशन आणि स्टाइलला कोणत्याही सीमा नसतात तसंच बायकी आणि पुरूषी अशा संज्ञांच्या बंधनांचे फासही फार घट्ट आवळलेले नसतात . म्हणूनच अनारकलीसारखे पॅटर्न जुजबी फरक करून स्त्री वा पुरूष दोघांसाठीही बाजारात दाखल होतात.

ठळक मुद्दे* पुरूषांच्या फॅशन दुनियेत इण्डो वेस्टर्न स्टाइल आघाडीवर आहे.* सध्याच्या काळात पुरूषांच्या फॅशन जगतात स्ट्रेट बॉटम, राऊंड बॉटम किंवा प्लॅकेट कुर्ता यांपैकी प्रत्येकच प्रकाराला मागणी आहे.

- मोहिनी घारपुरे- देशमुखअनारकली ड्रेसेसने ज्याप्रमाणे गेल्या काही काळापासून महिलांच्या वॉर्डरोबमध्ये आपली जागा निर्माण केली त्याप्रमाणेच आता पुरूषांसाठीही अनारकली ड्रेसेसची फॅशन आली आहे. तूर्तास या ड्रेसला फॅशन विश्वानं मनारकली असं टोपणनाव दिलं आहे.

फॅशन डिझायनर अबु जानी आणि संदीप खोसला यांनी नुकताच दिल्लीमध्ये फॅशन शो केला. यावेळी पुरूष मॉडेल्सच्या अंगावर हे मनारकली ड्रेसेस झळकत होते. फॅशन आणि स्टाइलला कोणत्याही सीमा नसतात तसंच बायकी आणि पुरूषी अशा संज्ञांच्या बंधनांचे फासही फार घट्ट आवळलेले नसतात . म्हणूनच अनारकलीसारखे पॅटर्न जुजबी फरक करून स्त्री वा पुरूष दोघांसाठीही बाजारात दाखल होतात असे यावेळी या डिझायनर्सनं सांगितले.

बाजीराव पेशवा या चित्रपटात रणबीर सिंहने घातलेले, रॉयल, मुघल अपील देणारे हे मनारकली ड्रेसेस सध्या फॅशन जगतात इन आहेत. विशेषत: सणसमारंभांमध्ये हे ड्रेसेस घालून पुरूष मिरवू शकतात. लग्नसराईच्या काळात या प्रकारच्या कपड्यांना विशेष मागणी येत आहे हे विशेष! 

 

इण्डो वेस्टर्न स्टाइल

पुरूषांच्या फॅशन दुनियेत इण्डो वेस्टर्न स्टाइल आघाडीवर आहे. आघाडीचे डिझायनर असलेले कुणाल रावल यांनी गेल्या वर्षाखेरीस नव्या स्टाइल्सचे शॉर्ट हेम्ड कुर्ताज पुरूषांसाठी लाँच केले. त्यानंतर ते अत्यंत लोकप्रिय झाले आहेत. हे कुर्ते पुरूषांच्या वॉर्डरोबमध्ये हमखास झळकताना दिसतात. मात्र असे असले तरीही या कुर्त्यांच्याबरोबर नेमकं काय घालावं, नेमकी कधी कोणती स्टाईल करून हे कुर्ते वापरावेत हे अनेकांच्या लक्षात येत नाही.सध्याच्या काळात पुरूषांच्या फॅशन जगतात अशा प्रकारचे कुर्ताज देखील खूप इन आहेत. स्ट्रेट बॉटम, राऊंड बॉटम किंवा प्लॅकेट कुर्ता (मानेखाली बटन्सची लाईन असलेला कुर्ता) यांपैकी प्रत्येकच प्रकाराला मागणी आहे. हे शॉर्ट कुर्ता घालून त्यावर एखादी बंडी, स्लीव्हलेस जॅकेट घालायचे आणि त्याखाली पटीयाला किंवा ब्रीच पॅण्ट्स किंवा चुडिदार घातली की पारंपरिक आणि आधुनिक असा दोन्हीही लुकचा मिलाफ साधला जातो. किंवा डेनिम आणि स्नीकर्स वर शॉर्ट कुर्ता आणि बंडी घातली तरीही छान दिसते. इंडो वेस्टर्न लुकसाठी कुर्तीवर ब्लेझर, चिनोज घातलं जातं.

इंडो वेस्टर्न लूक कॅरी करताना..

1) अशा काँटेम्पररी लुकबरोबर पायात मोजडी किंवा कोल्हापुरी चप्पल घाला.2) सिम्पल, शॉर्ट स्टोल्सदेखील घेता येतील. त्यानं लुक एकदम रिच दिसेल.3) काँटेम्पररी लुक साधण्यासाठी या बंडींचा वापर वेगवेगळ्या स्टाईलनं करता येईल. फक्त कपड्याचा पोत आणि योग्य रंग निवडता यायला हवा.