किसिंग सीन किती लांब असावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 03:46 IST
सेन्सॉर बोर्डाच्या अनाकलनीय धोरणामुळे शबाना आझमी सध्या नाराज आहेत. नु...
किसिंग सीन किती लांब असावा
सेन्सॉर बोर्डाच्या अनाकलनीय धोरणामुळे शबाना आझमी सध्या नाराज आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या बॉण्डपटातील 'किसिंग सीन' कोणतेही ठोस कारण न देता आहे त्यापेक्षा कमी केला आहे. यावर शबाना यांनी आक्षेप घेतला. सेन्सॉर बोर्ड मनमानी पद्धतीने काम करीत असल्याची टीका त्यांनी केली. 'स्पेक्टर' हा बॉण्डपट नुकताच भारतात रिलीज झाला. डॅनियल क्रेग ची भूमिका असलेला हा चौथा बॉण्डपट आहे.यातील बॉण्डचा एक किसिंग सीन कापून त्याचा कालावधी 50 सेकंदांपयर्ंत कमी करण्यात आला. या किसिंग सीन साठी 50 सेकंद पुरेसे आहेत, असा निष्कर्ष काढत सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांनी किसिंग सीनवर कात्री चालवली. 'हा निर्णय कशाच्या आधारावर घेण्यात आला, हेच मला समजू शकलेले नाही. किसिंग सीनचा नेमका कालावधी किती असावा? सेन्सॉर बोर्डाचे याबाबत काय धोरण आहे,' असा सवाल शबाना यांनी उपस्थित केला.