शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

​अशी करा डिजिटल सफाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 15:36 IST

नुकताच दिवाळी सण सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. दिवाळीच्या अगोदर आणि नंतर घराची साफसफाई केली जाते. विशेषत: लोक आपल्या घराची सफाई करताना जुने साहित्य म्हणजेच निकामी वस्तू टाकून देतात.

- Ravindra Moreनुकताच दिवाळी सण सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. दिवाळीच्या अगोदर आणि नंतर घराची साफसफाई केली जाते. विशेषत: लोक आपल्या घराची सफाई करताना जुने साहित्य म्हणजेच निकामी वस्तू टाकून देतात. जेणेकरून त्याऐवजी नवे साहित्य सेट करू शकतील. डिजिटल जगतातदेखील काही गॅजेट्स खूप अव्यवस्था निर्माण करतात. अशावेळी डिजिटल सफाईदेखील आवश्यक आहे. मग डिजिटल सफाई काय आहे आणि कशी कराल, याबाबत आजच्या सदरात जाणून घेऊया...   * सर्वप्रथम घरातील सर्व केबल, चार्जर आणि वायर्स एकत्र करा. बऱ्याच वर्षापासूनचे केबल्स आणि चार्जर्स आपल्या घरात पडलेले असतात. आपल्याला माहितदेखील नसते की, कोणती केबल कोणत्या डिव्हाइसची आहे. म्हणून अशी निकामी केबल, चार्जर त्वरित एकत्र करुन त्यांची सफाई करा. * बऱ्याच लोकांच्या ईमेलच्या इनबॉक्समध्ये हजारो ई-मेल पडलेले असतात. सर्वचजण ईमेल डिलीटदेखील करीत नाहीत. मात्र असे न केल्याने तांत्रिक अडचणी येऊ शकतात, म्हणून जे महत्त्वपूर्ण ईमेल नसतील त्यांना त्वरित डिलीट करा. त्यासाठी सर्वप्रथम इनबॉक्सच्या शेवटच्या पानावर जाऊन त्यापासून महत्त्वपूर्ण नसलेले ईमेल डिलीट करु शकतात. त्याशिवाय ट्रॅश फोल्डर आणि स्पॅम फोल्डरलाही डिलीट करुन त्याची सफाई करु शकतात.    * बरेचजण मोबाईल, लॅपटॉप किंवा कंप्युटरमध्ये जास्तीचे अ‍ॅप डाउनलोड करतात. यामुळे बºयाच अडचणी निर्माण होतात. शिवाय स्क्रीनदेखील खराब दिसते. यासाठी सहा महिने ज्या अ‍ॅपचा वापर केला नसेल त्या अ‍ॅपला त्वरित अनइन्स्टॉल करा. * आपल्या डिव्हाइसमधील महत्त्वपूर्ण डाटा, फोटो आणि व्हिडिओ आदींना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था करा. यासाठी डाटा बॅकअपसाठी आपण एक्स्टर्नल हार्ड ड्राइव्ह किंवा क्लाउड स्टोरेजची मदत घेऊ शकतात.   * आज प्रत्येकजण सोशल मीडियावर सक्रिय आहे. बºयाचजणांची तर व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकवर हजारोंची फ्रेंडलिस्ट असते. बºयाचदा या फ्रेंडस्ला आपण ओळखतदेखील नाही. मात्र या फ्रेंडस् पाठविलेल्या पोस्ट किंवा मेसेजेसमुळे आपल्या डिव्हाइसची मेमरी फुल होत असेल तर अशा फ्रेंडस्ना त्वरित अनफ्रेंड करा.  * बऱ्याचदा आपण आपल्या डिव्हाइसच्या वेब ब्राऊजर्सवर आपण बुकमार्क आणि स्पीड डायल शॉर्टकट्स बनवून ठेवतो आणि त्याबाबतीत आपणास विसरदेखील पडलेला असतो. अशावेळी तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून वापरून झालेले बुकमार्कची त्वरित सफाई करुन टाका. * आपण आपल्या ब्राऊजरमध्ये असलल्या टेम्प फाइल्सदेखील क्लीन करु शकता. जर आपण ओपेरा यूज करत असाल तर आपले काम अजूनही सोपे होईल. फक्त आपल्याला टूल्समधील ‘डिलीट प्रायवेट डेटा’ वर क्लिक करायचे आहे, आणि त्यानंतर काय करायचे आहे हे आपणास ओपेरा ब्राऊजर खूप चांगल्या पद्धतीने मदत करेल. * वेब ब्राउजरमध्ये दिलेले एक्सटेंशन धोकेदायक वेबसाइट्स आणि लिंकपासून आपल्या डिव्हाइसचे संरक्षण करु शकतात. गुगल क्रोम ब्राऊजरमध्ये कित्येक एक्सटेंशन आहेत जे इंटरनेटवरील मॅलवेयरच्या आक्रमणापासून आपल्या डिवाइसला खराब होण्यापासून वाचवू शकतात. यासाठी त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. * आपल्या गॅजेटमध्ये वेगवेगळ्या विषयानुसार वेगवेगळ्या फाइल्स बनवा आणि त्यांना त्यानुसार नावेदेखील द्या. जेणेकरुन आपणास लक्षात राहील. गरज नसलेल्या फाइल्स लगेच डिलीट करा, यामुळे मेमरी वाचेल. शिवाय फाइल शोधायला वेळदेखील लागणार नाही. * स्मार्टफोन, टॅब आणि कंप्यूटरची आतील सफाई तर झाली, मात्र बाहेरच्या सफाईचे काय? यासाठी योग्य क्लिनरचा वापर करुन पुन्हा नव्या सारखे करु शकतात. गॅजेटच्या दुकानावरून योग्य प्रॉडक्ट्स घेऊ शकतात. साबणाच्या पाण्याने चुकूनही डिव्हाइसची सफाई करु नका.