'ब्रिजेस ऑफ स्पाईस'चा प्रीमियर रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:37 IST
'ब्रिजेस ऑफ स्पाईस'चा प्रीमियर रद्दपॅरिसमध्ये शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्लय़ानंतर निर्माते, दिग्दर्शक स्टीव्हन स्बीलबर्ग यांच्या 'ब्रिजेस ऑफ स्पाईज' या शीतयुद्धावर आधारित चित्रपटाचा प्रिमियर रद्द करण्यात आला आहे.
'ब्रिजेस ऑफ स्पाईस'चा प्रीमियर रद्द
पॅरिसमध्ये शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्लय़ानंतर निर्माते, दिग्दर्शक स्टीव्हन स्बीलबर्ग यांच्या 'ब्रिजेस ऑफ स्पाईज' या शीतयुद्धावर आधारित चित्रपटाचा प्रिमियर रद्द करण्यात आला आहे. रविवार १५ रोजी तो आयोजित करण्यात आला होता. हल्ला झाला त्यावेळी स्पिलबर्ग हे बर्लिन ते पॅरिस प्रवास करीत होते. हल्लय़ात ठार झालेल्या निरपराध लोकांच्या नातेवाईकांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असा संदेश स्पिलबर्ग यांच्या वतीने देण्यात आला आहे. हल्ला झाला त्याच दिवशी बर्लिंमध्ये या चित्रपटाचा प्रिमियर आयोजित करण्यात आला होता. त्या पाठोपाठ पॅरिसमध्येही तशाच आयोजनाची कल्पना होती.